इरफान पठाण आणि युसूफ पठाण मैदानातच भिडले; चिडलेल्या इरफानने सुनावलं अन् नंतर...' VIDEO तुफान व्हायरल

इरफान पठाण (Irfan Pathan) आणि युसूफ पठाण (Yusuf Pathan) यांच्यात धाव घेताना गैरसमज झाला आणि इरफानला विकेट गमवावी लागली. यानंतर इरफान पठाण युसूफवर चांगलाच संतापला होता. त्यांचा मैदानातील व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 11, 2024, 04:27 PM IST
इरफान पठाण आणि युसूफ पठाण मैदानातच भिडले; चिडलेल्या इरफानने सुनावलं अन् नंतर...' VIDEO तुफान व्हायरल title=

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इऱफान पठाण (Irfan Pathan) आपला भाऊ युसूफ पठाणवर (Yusuf Pathan) चांगलाच संतापला. वर्ल्ड चॅम्पिअन्स ऑफ लेजंडमध्ये (World Championship of Legends) दक्षिण आफ्रिकेविरोधातील हा प्रकार घडला. धाव घेताना झालेलया गोंधळात विकेट गमवावी लागल्याने इरफान पठाण संतापला. 19 व्या ओव्हरला डेल स्टेनच्या गोलंदाजीवर इरफानने उंच फटका लगावला होता. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी झेल घेण्याचा प्रयत्न केला, पण अयशस्वी ठरले. यादरम्यान इरफान आणि युसूफने एक धाव काढली. पण दुसरी धाव घेताना त्यांच्यात गोंधळ उडाला. इरफान दुसऱी धाव घेण्यासाठी पळाला होता. सुरुवातील युसूफही पुढे आला होता. पण नंतर युसूफने माघार घेतली आणि याच गोंधळात इरफानला विकेट गमवावी लागली. 

झेल सुटल्यानंतरही धावबाद झाल्याने इरफान पठाण प्रचंड नाराज झाला होता. त्याने मैदानात आपला हा संताप व्यक्तही केला. त्याने मैदानातच युसूफ पठाणला सुनावलं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात 8 गडी गमावत 210 धावा केल्या होत्या. भारतीय संघाला मात्र फक्त या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवायचं होतं. भारताला सेमी-फायनसाठी पात्र होण्याकरिता 153 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याची गरज होती. भारताने हा सामना 54 धावांनी गमावला, मात्र सेमी-फायनलसाठी पात्र ठरले. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा प्रवास मात्र संपला. 

जॅक सिनमन आणि यष्टिरक्षक रिचर्ड लेवी यांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत एकूण 210 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताला 20 षटकांत 156 धावांतच रोखलं आणि विजयासह स्पर्धेला समारोप दिला. मागील सामन्यात पाकिस्तानविरुद्ध नाबाद 82 धावा करणाऱ्या सिनमनने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवले आणि 43 चेंडूत 73 धावा करून आपल्या संघाचा भक्कम पाया रचला. लेवीने 25 चेंडूत 60 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये जोरदार पुनरागमन केले, परंतु ते मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखू शकले नाहीत.

हरभजन सिंगने 4 विकेट्स घेतल्या. धावांचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर आपल्या संघाला चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरले आणि अव्वल पाच खेळाडू माघारी परतले. 11.3 षटकात फक्त 77 धावा झाल्या होत्या. यानंतर युसूफ (44 चेंडूत 54*) आणि इरफान (21 चेंडूत 35 धावा) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तान चॅम्पियन्सचा सामना वेस्ट इंडिजच्या चॅम्पियनशी होईल तर दुसरा सामना शुक्रवारी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात होईल.