मुंबई : जगात सर्वात खडतर समजली जाणारी फ्रान्समधील ट्रायथेलॉन स्पर्धा यंदा आयपीएस ऑफिसर कृष्णप्रकाश यांनी जिंकली आहे.
कृष्णप्रकाश यांना आयर्नमँन अर्थात लोहपुरुष हा किताब मिळाला. अभिनेता मिलिंद सोमणनंतर लोहपुरुषाचा हा किताब पटकावणारे कृष्णप्रकाश हे दुसरे भारतीय आहेत.
तर भारतातले पहिले प्रशासकिय अधिकारी आहेत.
१८६ कि.मी. सायकलींग, ४२ कि.मी. धावणे आणि ४ कि.मी. पोहणे हे तिन्ही प्रकार एकत्रीतरित्या या एकाच स्पर्धेत पार पाडायचे असतात. यासाठी १६ तासांचा अवधी असतो. मात्र, हे आव्हान कृष्णप्रकाश यांनी केवळ १४ तासांत पूर्ण केलं. वयाची सत्तेचाळीशी गाठलेल्या कृष्णप्रकाश यांनी केवळ साडेतीन महिन्यांच्या तयारीत ही स्पर्धा जिंकली. भारतीय सनदी सेवेतून आयर्नमॅन स्पर्धेत यश प्राप्त केलेले ते एकमेव अधिकारी आहेत.
द आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धा ही जगभरातील क्रीडाप्रेमींना आणि खेळाडूंना खुणावत असते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रथम पात्रता फेरीत यश मिळवावं लागतं.