IPL2021: टॉससाठी फेकलेलं नाणं संजूने खिशात टाकलं, व्हिडीओ व्हायरल

अरे देवा! टॉस जिंकल्यानंतर संजूनं जे केलं ते पाहून तुम्हालाही येईल हसू

Updated: Apr 16, 2021, 03:07 PM IST
IPL2021: टॉससाठी फेकलेलं नाणं संजूने खिशात टाकलं, व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई: अनेकदा गल्ली क्रिकेटमध्ये टॉससाठी फेकलेलं नाणं उचलून खिशात टाकल्याचं पाहिलं असेल किंवा स्वत: काहीवेळा अनुभवही घेतला असेल पण असा प्रकार चक्क IPL दरम्यान घडला आणि मैदानात उपस्थित सर्वांचा चेहऱ्यावरचे भावच बदलले. 

टॉस फेकल्यानंतर तो खाली पडला की साधारणपणे रेफरी ते नाणं उचलतो. मात्र राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने मजेशीर गोष्ट केली. त्यावेळी उपस्थितांना हसू की...असा प्रकार झाला. हा प्रकार पाहून सर्वजण हैराण झाले.

टॉससाठी नाणे हवेत उडून खाली पडलं. त्याक्षणी संजूनं ते नाणं उचलून आपल्या खिशात टाकलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ IPLच्या टीमनं सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा प्रकार पाहून रेफरीच नाही तर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आणि हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ आहे राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब पहिला सामना झाला होता त्यावेळचा मात्र सध्या तो तुफान चर्चेत आहे. पंजाब आणि राजस्थानमध्ये नाणेफेक झाल्यानंतर संजूनं नाणं उचलून खिशात टाकलं. पंजाबचा कर्णधार नेमकं काय सुरू आहे हे पाहातच राहिला तर रेफरीही गोंधळात पडला.

राजस्थान रॉयल्स संघाचा दिल्ली विरुद्धच्या संघात 3 विकेट्सने विजय झाला आहे. तर पंजाब विरुद्धच्या सामन्यात त्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. 19 एप्रिल रोजी चेन्नई तर 22 एप्रिल रोजी RCB संघासोबत सामना होणार आहे.