IPL Trophy Sanskrit shloka: ट्रॉफीवर संस्कृतमध्ये लिहीलाय खास श्लोक, काय आहे याचा नेमका अर्थ?

IPL Trophy Sanskrit shloka: आयपीएलच्या या ट्रॉफीवर ( IPL Trophy ) खास संस्कृतमध्ये ( Sanskrit shloka ) एक श्लोक लिहिण्यात आला आहे. या ट्रॉफीवर लिहिलेला खास मेसेज तुम्ही पाहिलाय का? काय आहे याचा नेमका अर्थ जाणून घेऊया.

Updated: May 28, 2023, 09:59 PM IST
IPL Trophy Sanskrit shloka: ट्रॉफीवर संस्कृतमध्ये लिहीलाय खास श्लोक, काय आहे याचा नेमका अर्थ? title=

IPL Trophy Sanskrit shloka: आयपीएल 2023 ( IPL 2023 ) आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आज आयपीएलचा ( IPL 2023 ) फायनल सामना खेळवण्यात येतोय. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना अजून सुरु झालेला नाही. यावेळी विजेता कोण ठरणार आणि आयपीएलची ट्रॉफी  ( IPL Trophy ) कोणत्या टीमच्या कर्णधाराच्या हाती जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र तुम्ही कधी पाहिलंय का, आयपीएलच्या या ट्रॉफीवर ( IPL Trophy ) खास संस्कृतमध्ये ( Sanskrit shloka ) एक मेसेज लिहीलेला असतो. 

आजच्या सामन्यात जो जिंकणार त्याला आयपीएलची चमकणारी ट्रॉफी देण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याकडे ( Hardik Pandya ) ही ट्रॉफी देण्यात येईल की 4 वेळा विजयी असलेल्या महेंद्र सिंग धोनीच्या ( MS Dhoni ) हाती जाणार, हे पहावं लागणार आहे. अशातच या ट्रॉफीवर लिहिलेला खास मेसेज तुम्ही पाहिलाय का? या मेसेजमध्ये 'यात्रा प्रतिभा अवसरा प्राप्नोतिहि' असं लिहिण्यात आलेलं आहे. 

काय आहे याचा अर्थ?

‘यत्र प्रतिभा अवसरा प्राप्नोतिहि’ संस्कृतमध्ये लिहिलेल्या या शब्दांचा अर्थ असा आहे की, प्रतिभा आणि संधी एकत्र ठिकाणी. संस्कृत भाषेत लिहिलेल्या या श्लोकाच्या अर्थाप्रमाणे, आयपीएलने टीम इंडियाला अनेक प्रतिभावान खेळाडू दिले आहेत. 

फायनल सामन्याचे अपडेट

चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) विरूद्ध गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) यांच्यामध्ये फायनलचा सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यामध्ये पावसाने खेळ केलाय. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ( Narendra Modi Stadium ) पावसाने पु्न्हा एकदा व्यत्यय आणला आहे. यामुळे वेळेत सामना सुरु होऊ शकला नाही. पाऊस थांबला नसल्याने टॉसही होऊ शकलेला नाही. यामुळे आता ओव्हर्समध्ये कटिंगही होणार आहे. 

दरम्यान काही वेळापूर्वी हवामान स्वच्छ झालं होतं. त्यानंतर कव्हर्स काढून टाकण्यात आले. याचशिवाय मैदान आणि खेळपट्टी कोरडे करण्याचे काम सुरू झालं होतं. मात्र अशातच पुन्हा एकदा आता पावसाने त्याचा खेळ सुरु केला. दोन्ही टीमचे खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज़

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात, शरद पवार दिल्लीत; 5 ऑक्टोबर अत्यंत महत्वाचा दिवस

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात, शरद पवार दिल्लीत; 5 ऑक्टोबर अत्यंत महत्वाचा दिवस

Raj Thackeray : '...हे कुठंतरी थांबलं पाहिजे', सण उत्सवाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांचे राज ठाकरेंनी टोचले कान

Raj Thackeray : '...हे कुठंतरी थांबलं पाहिजे', सण उत्सवाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांचे राज ठाकरेंनी टोचले कान

Pune News : पुण्यात चाललंय तरी काय? ससून रुग्णालय प्रवेशद्वारातून ड्रग्जचा साठा जप्त!

Pune News : पुण्यात चाललंय तरी काय? ससून रुग्णालय प्रवेशद्वारातून ड्रग्जचा साठा जप्त!

चित्रपटाच्या व्यस्त शेड्यूलमुळे 'या' सेलिब्रेटी कपल्सनी वगळला लग्नानंतरचा मधूचंद्र..

चित्रपटाच्या व्यस्त शेड्यूलमुळे 'या' सेलिब्रेटी कपल्सनी वगळला लग्नानंतरचा मधूचंद्र..

Horoscope 02 October 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींनी महत्त्वाचा निर्णय घेण्याची घाई करू नये!

Horoscope 02 October 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींनी महत्त्वाचा निर्णय घेण्याची घाई करू नये!

'रियासाठी कपडे काढायला तयार...', शहनाज गिलचं धक्कादायक वक्तव्य

'रियासाठी कपडे काढायला तयार...', शहनाज गिलचं धक्कादायक वक्तव्य

51 दिवसांनंतरही कमी झाली नाही ब्लॉकबस्टर 'गदर 2' ची क्रेझ;  कलेक्शनचा आकडा पाहून बसेल धक्का

51 दिवसांनंतरही कमी झाली नाही ब्लॉकबस्टर 'गदर 2' ची क्रेझ; कलेक्शनचा आकडा पाहून बसेल धक्का

टीव्ही अभिनेत्रींपेक्षा भले मोठे कानातले घालून सोनमनं वेधलं लक्ष!

टीव्ही अभिनेत्रींपेक्षा भले मोठे कानातले घालून सोनमनं वेधलं लक्ष!

Horoscope Money Weekly : शुक्र, मंगळ गोचरमुळे 'या' राशी ठरणार भाग्यवान, हा आठवडा कसा आहे तुमच्यासाठी जाणून घ्या

Horoscope Money Weekly : शुक्र, मंगळ गोचरमुळे 'या' राशी ठरणार भाग्यवान, हा आठवडा कसा आहे तुमच्यासाठी जाणून घ्या

Panchang Today : आज कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीसोबत बुधादित्य राजयोग आणि सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीसोबत बुधादित्य राजयोग आणि सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

इतर बातम्या

OYO संस्थापक ते शार्क टँकचे जज; Ritesh Agarwal यांच्या...

भारत