यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात (IPL 2021 Eliminator) रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) एकमेकांसमोर आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. (ipl eliminator 2021 rcb vs kkr head to head recods royals chalengers banglore vs Kolkata Knight Riders see stats)
कोलकाताचं नेतृत्व इयॉन मॉर्गन करणार आहे. तर विराट बंगळुरुची कॅप्टन्सी करणार आहे. क्लालिफायर 2 मध्ये पोहचण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही टीम्सचा कस लागणार आहे.
आकडेवारी कोणाच्या बाजूने?
आयपीएमध्ये हे दोन्ही संघ एकूण 29 वेळा भिडले आहेत. यामध्ये कोलकाता बंगळुरुवर वरचढ राहिली आहे. कोलकाताने 16 सामन्यांमध्ये बंगळुरुचा पराभव केला आहे. तर विराटसेनेने कोलकाताला 13 मॅचमध्ये अस्मान दाखवलं आहे.
या दोन्ही टीम्समध्ये खेळवण्यात आलेल्या मागील 5 मॅचेसमध्ये बंगळुरुचा बोलबाला राहिला आहे. बंगळुरुने या 5 पैकी 4 सामन्यात बाजी मारली आहे. तर कोलकाताला केवळ 1 सामनाच जिंकता आला आहे.
शारजाहमध्ये दोन्ही संघांनी 2 सामने खेळले आहेत. दोन्ही टीम्सने प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. तर या मोसमातील साखळी फेरीत दोन्ही टीम 2 वेळा आमनेसामने खेळले. या 2 पैकी दोन्ही संघांनी एक एक वेळा विजय मिळवला आहे.
आकड्याबाबत बोलायचं झालं तर काही अंशी कोलकाता ही वरचढ आहे. मात्र या अटीतटीच्या सामन्यात दोन्ही संघ सामना जिंकण्यासाठी जोर लावणार आहेत.
कोलकाताकडे वरुण चक्रवर्थी, सुनील नरेन आणि शाकिब अल हसल अशी फिरकी तिकडी आहे. तर बंगळुरुकडे एबी डीव्हीलयर्स, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि देवदत्त पडीक्कल अशी फलंदाजांची चौकडी आहे. त्यामुळे या खेळाडूंमध्ये चांगलाच सामना पाहायला मिळणार आहे.
त्यामुळे हा एलिमिनेटर सामना जिंकून बंगळुरु दिल्ली विरुद्ध भिडणार, की कोलकाता पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने पुढचं पाऊल टाकणार, याकडे क्रिकेटप्रेमी लक्ष ठेवूण आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भारत (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हीलियर्स, डॅनियल क्रिश्चियन, शाहबाज अहमद, जॉर्ज गार्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, कायले जेमीन्सन, नवदीप सैनी, टीम डेव्हिड, दुश्मंथा चमीरा, सचिन बेबी, पवन देशपांडे, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, वनिंदू हसरंगा, सुयश प्रभुदेसाई आणि आकाश दीप.
कोलकाता नाईट रायडर्स | शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, इऑन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाकिब अल हसन, नील नारायण, लॉकी फर्ग्युसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, टीम साउथी, हरभजन सिंग, आंद्रे रसेल, बेन कटिंग, करुण नायर, पवन नेगी, गुरकीरत सिंग मान, शेल्डन जॅक्सन, संदीप वॉरियर, टीम सेफर्ट, प्रसिध कृष्णा, रिंकू सिंग, कमलेश नगरकोटी आणि वैभव अरोरा.