मुंबई : भारतील सर्वात मोठा क्रिकेट सीझन म्हणजेच आयपीएलच्या खेळाची सुरवात झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू इंग्लंडची सीरीज जिंकूण आल्यानंतर आपआपल्या आयपीएल टीमचे भाग बनले आहेत आणि आपला दमदार प्रदर्शन करत आहेत. युवा क्रिकेटपटूंवर तर प्रत्येक व्यक्तीची नजर असते. या खेळाडूंचे पहिले स्वप्न तर भारतीय संघात निवड होणाचे असते. परंतु त्यानंतर त्यांचे दुसरे स्वप्न हे असते की, त्यांची स्वत:ची लक्झरी कार असावी.
अनेक खेळाडू आपल्या मेहनतीने लक्झरी गाडी खरेदी करतात. आज आपण अशाच काही खेळाडूंच्या महागड्या गाड्या आणि त्यांच्या किंमती बद्दल माहिती घेऊयात.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाजाने ऑस्ट्रेलिया सीरीजमध्ये आपला डेब्यू केला. डेब्यूमध्ये सिराज ने दाखवले की, तो या टीममध्ये खेळण्यासाठी फिट आहे. सिराज ने या काळात एकूण 13 विकेट घेतले. त्यानंतर तो खूप प्रसिद्ध झाला. आता त्याच्याकडे BMW 520d सिडन कार आहे. या कारची किंमत 61 लाख आहे. त्यानंतर त्याला आनंद महेंन्द्रानेही महेंन्द्रा थार, 'बर्थ डे' गिफ्ट केली आहे.
सूर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये आपल्या प्रदर्शनातून सर्वांचीच मने जिंकली आहेत. त्याने अलीकडेच भारत विरुद्ध इंग्लंड मॅचमध्ये डेब्यू केला आहे. त्याने सध्या सेकंन्ड हॅन्ड लँड रोव्हर रेंज रोव्हर Velar विकत घेतली आहे. ही कार जगातील सर्वात बेस्ट कार आहे. याची किंमत 75 लाख आहे.
सिक्सर किंग युवराज सिंहला कोण ओळखत नाही. युवराज गाड्यांचा खूपच शौकिन आहे. त्यांच्याकडे आता मिनी कूपर कंट्रीमॅन आहे, जी त्यांची पत्नी हजेलने त्याला दिली आहे. या गाडीमध्ये स्पॉयलर विंग, कीलेस एंट्री सिस्टम, हेड्स अप डिस्प्ले, नेव्हीगेशन सिस्टीम, वायरलेस चार्जिंग सारखे अनेक फीचर्स आहेत.
रिषभ पंतला दुसरा धोनी म्हणून ओळखले जाते. तो सध्या आयपीएलमध्ये दिल्ली टीमचा कॅप्टन आहे. या खेळाडूकडे फोर्ड मस्टँग जीटीची कार आहे, ज्याची किंमत 65 ते 70 लाखा दरम्यान आहेत. रिषभ कडे आणखी एक कार आहे. ती मर्सिडीज बेंज GLC SUV आहे. त्याची किंमत सुमारे 60 लाख रुपये आहे.
इंग्लंडच्या विरुद्ध खेळ्यासाठी जेव्हा ईशानला टीम इंडीयामधून संधी मिळाली, तेव्हा त्याने या संधीचा फायदा घेऊन टीममध्ये आपली जागा पक्की केली आहे. अलीकडेच इशान किशन ने BMW X5 विकत घेतली आहे. मीडीया रीपोर्टनुसार त्याच्याकडे BMW X6 सुद्धा आहे. या कारची किंमत 75 ते 80 लाख रुपये इतकी आहे.