IPL Auction: अंडर १९ खेळलेल्या 'बाडमेर एक्स्प्रेस' कमलेश नागरकोटीला ३ कोटीपेक्षा जास्त

अंडर १९ विश्वचषकात १४९ किमी प्रतीतास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या, कमलेश नागरकोटीचा जलवा आयपीएल लीलावात दिसून आला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 27, 2018, 07:13 PM IST
IPL Auction: अंडर १९ खेळलेल्या 'बाडमेर एक्स्प्रेस' कमलेश नागरकोटीला ३ कोटीपेक्षा जास्त title=

बंगळुरू : इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल २०१८ चा लिलाव शनिवारी बंगळुरूत सुरू झाला. अंडर १९ विश्वचषकात १४९ किमी प्रतीतास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या, कमलेश नागरकोटीचा जलवा आयपीएल लीलावात दिसून आला.

बाडमेर एक्स्प्रेसच्या नावाने प्रसिद्ध

बाडमेर एक्स्प्रेसच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या कमलेश नागरकोटीला, कोलकाता नाईट रायडर्सने ३ कोटी २० लाखात खरेदी केलं. कमलेश नागरकोटीचे वडिल लच्छम सिंह भारतीय सेनेत मानद कॅप्टन पदावरून डिसेंबर २०१४ मध्ये निवृत्त झाले आहेत.

वडील आर्मीत असल्याने कमालीची शिस्त

एक सैनिकाचा मुलगा असल्याने कमलेश नागरकोटी आर्मी स्कूलमध्ये शिकलेला आहे, आर्मीचं बँकग्राऊंड असल्याने कमलेशमध्ये कमालीची शिस्त पाहायला मिळते, कमलेश नागरकोटी हे तीन भाऊ-बहिण आहेत. यात कमलेश सर्वात लहान आहे. कमलेशचे मोठे बंधू विनोद सिंह नागरकोटी देखील क्रिकेट खेळतात, ते एका अॅकॅडमीत कोच देखील आहेत.