हेड-अभिषेक की जयस्वाल-सॅमसन? राजस्थान-हैदराबादमध्ये कोणती बेस्ट Playing XI

SRH vs RR: आयपीएल 2024 मध्ये आज दुसरा क्वालिफायर सामना रंगणार आहे. या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने असणार आहेत. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन कशी असणार आहे. 

राजीव कासले | Updated: May 24, 2024, 03:06 PM IST
 हेड-अभिषेक की जयस्वाल-सॅमसन? राजस्थान-हैदराबादमध्ये कोणती बेस्ट Playing XI title=

IPL 2024 SRH vs RR : आयपीएल 2024 मध्ये आज दुसरा क्वालीफायर सामना खेळवला जाणार असून सनरायजर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) आमने सामने असणार आहेत. सनरायजर्स हैदराबाद संघ आयपीएल पॉईंटेटबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे क्वालिफायर 1 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (KKR) पराभव झाल्यानंतरही एसआरएचला दुसरी संधी मिळाली आहे. तर राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात जबरदस्त फॉर्मात असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभवाचा धक्का देत क्वालिफायर 2 मध्ये दणक्यात एन्ट्री केली.

आता SRH vs RR सामन्यातील विजेता संघ 26 मे रोजी एमए चिंदबरम स्टेडिअमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएलच्या सतराव्या हंगामातील फायनल खेळेल. आजच्या सामन्यात मुख्य लढत असेल ती दोन्ही संघांच्या फलंदाजांधमध्ये ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेन्रिक क्लासेन, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन आणि रियान पराग अशी दमदार फलंदाजी पाहायला मिळणार आहे.

खेळपट्टीची साथ कोणाला
हैदराबाद आणि राजस्थानदरम्यानचा दुसरा क्वालिफायर सामना चेन्नईच्या केएम चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जाणार आहेत. चेपॉकची खेळपट्टी आतापर्यंत फलंदाजांना साथ देणारी ठरली आहे. यंदाच्या आयपीएल हंगामा या मैदानावर आतापर्यंत अनेकवेळा 200 हून अधिक धावांचा स्कोर उभा राहिला आहे. हैदराबाद आणि सनरायजर्स या दोन्ही संघांची मजबूत फलंदाजी हीच जमेची बाजू आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात चेपॉकवर धावांची बरसात होणार हे नक्की.

SRH vs RR हेड टू हेड
सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आयपीएलमध्ये आतापर्यंत 19 वेळा आमने सामने आले आहेत. यात 10 वेळा हैदराबादने तर 9 वेळा राजस्थान रॉयल्सने बाजी मारली आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात दोन्ही संघ केवळ एकदा आमने सामने आले आहेत, आणि यात हैदराबादने पहिली फलंदाजी करताना 201 धावा केल्या होत्या. तर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने 200 धावा केल्या. अवघ्या एका धावेने राजस्थानला पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाचा बदला घेण्याचा राजस्थानकडे चांगली संधी आहे. 

हैदराबादची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश कुमार रेड्डी, शाहबाज अहमद, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, सनवीर सिंग, पॅट कमिन्स ( कर्णधार ), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.

राजस्थानची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन ( कर्णधार आणि विकेटकीपर ), रायन पराग, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल