IPL 2024 : कृणाल पांड्या नाही तर 'हा' धाकड खेळाडू असणार LSG चा नवा उपकर्णधार

Nicholas Pooran : लखऊ सुपर जायंट्सने  (LSG) आयपीएल 2024 च्या मोसमासाठी आपल्या नव्या उपकर्णधाराचे नाव जाहीर केलेले आहे. मागील वर्षी आयपीएल 2023 मध्ये केएल राहूल अर्ध्या सीझनमध्येच दुर्देवाने जखमी झाला होता. आता लखनऊ संघाने प्लॅन बी तयार ठेवलाय.

Updated: Feb 29, 2024, 04:53 PM IST
IPL 2024 : कृणाल पांड्या नाही तर 'हा' धाकड खेळाडू असणार LSG चा नवा उपकर्णधार title=

IPL 2024 : लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) आयपीएलच्या 2024 च्या मोसमासाठी त्यांचा उपकर्णधार म्हणून वेस्ट इंडिजचा लिमिटेड ओव्हर्रच्या संघाचा कर्णधार निकोलस पूरन याची घोषणा केली आहे. मागच्या वर्षी 16 कोटी रुपयांना लखनऊमध्ये सामील झालेला पूरन कर्णधार केएल राहुलसोबत संघाची जबाबदारी सांभाळेल. मागील दोन्ही हंगामात लखनऊच्या संघाने प्लेऑफ गाठली होती. अशातच आता यंदाच्या वर्षीत लखनऊचा संघ फायनलपर्यंतची मजल मारणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

उपकर्णधारपदी पूरनची नेमणूक ही आश्यर्यचकित करणारी आहे, कारण मागील वर्षी केएल राहुल हा दुखापतीमुळे अर्ध्या सिजनमधून बाहेर पडला होता. यानंतर लखनऊ फ्रेंचाइजीचे नेतृत्व राहिलेल्या सामन्यांसाठी कृणाल पांड्याने केलं होतं. LSG ने गेल्या वर्षी स्पष्टपणे उपकर्णधाराची घोषणा केली नव्हती परंतु राहुलच्या दुखापतीमुळे कृणालने सूत्रे हाती घेतली होती. यामुळे कृणाल एलएसजीचा उपकर्णधार मानला जात होता.

कृणालच्या जागी पूरनची नेमणूक आश्चर्यचकित करणारी

कृणालच्या नेतृत्वाखाली, LSG ने त्यांच्या सहा सामन्यांपैकी तीन जिंकले तर दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्धचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. तरीही, या हंगामात लखनऊला त्यांचे पहिले जेतेपद मिळवून देण्याच्या उद्देशाने पूरनची नवा उपकर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 

 

आयपीएलच्या पहिल्या दोन वर्षांत LSG ने खरोखरच चांगली कामगिरी केली होती. जस्टिन लँगर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक आणि देवदत्त पडिक्कल, शिवम मावी, डेव्हिड विली, एम सिद्धार्थ आणि शामार जोसेफ (मार्क वुडच्या जागी) यांच्यासारख्या काही चांगल्या नवीन भरतीसह, लखनऊचा संघ आता अधिक मजबूत झालाय आणि त्यांना आता आयपीएलच्या ट्रॉफीची आशा आहे.

मिडल ऑर्डर मध्ये खेळणार राहुल?

लखनऊच्या या वर्षाची आणखी एक नवीन बाजू म्हणजे, गेल्या दोन मोसमात कसलामीचा फलंदाज म्हणून खेळल्यानंतर कर्णधार केएल राहुल आता मधल्या फळीत खेळणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तेव्हा तो आयपीएल 2024 मध्ये कशी कामगिरी करतो ते पाहणं महत्वाचं ठरेल.

आयपीएल 2024 साठी LSG चा स्क्वॉड

केएल राहुल, क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बदोनी, काइल मेयर्स, मार्कस स्‍टॉइनिस, दीपक हुड्डा, रवि बिश्‍नोई, नवीन उल हक, कृणाल पांड्या, युद्धवीर सिंह, प्रेरक मांकड, यश ठाकुर, अमित मिश्रा, मार्क वुड, मयंक यादव, मोहसिन खान, शिवम मावी, एम सिद्दार्थ, डेविड विली, एश्टन टर्नर, अर्शिन कुलकर्णी आणि अरशद खान.