'हार्दिक पांड्या गेल्याने...' गुजरात टायटन्स सोडण्यावर मोहम्मद शमीची धक्कादायक प्रतिक्रिया

Shami on Hardik Pandya: स्टार ऑलराऊंडर हार्दिक  पांड्या आयपीएलच्या सतराव्या हंगामापूर्वी गुजरात टायटन्सची साथ सोडून मुंबई इंडियन्समध्ये सहभागी झालाय. यावर गुजराताच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची धक्कादायक प्रतिक्रिया समोर आली आहे. 

राजीव कासले | Updated: Jan 16, 2024, 09:14 PM IST
'हार्दिक पांड्या गेल्याने...' गुजरात टायटन्स सोडण्यावर मोहम्मद शमीची धक्कादायक प्रतिक्रिया title=

Mohammed Shami dig at Hardik Pandya : भारतीय क्रिकेट चाहत्यांना वेध लागले आहेत ते आयपीएलच्या नव्या हंगामाचे. मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून आयपीएलचा सतरावा हंगाम सुरु होण्याची शक्यता आहे. यासाठी खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली असून सर्व दहा संघ निश्चित झाले आहेत. यंदाच्या आयपीएलची सर्वात मोठी घडामोड म्हणजे स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) मुंबई इंडियन्समधला कमबॅक. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचा (Gujarat Titans) कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याने गुजरातची साथ सोडून मुंबईचा हात धरला. इतकंच काय तर राहुल शर्माला वगळून हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) कर्णधारपदही सोपवण्यात आलं. 

शुभमन गिल नवा कर्णधार
भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने पंधरा कोटी रुपयांवर ट्रेड केलं. हार्दिक पांड्या गेल्यानंतर शुभमन गिलला गुजरात टायटन्सचा नवा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आलं. यावर गुजरात टायटन्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पहिली प्रतिक्रियासमोर आली आहे. 

काय बोलला मोहम्मद शमी?
आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात दमदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शमीने एका मुलाखीत हार्दिक पांड्या गेल्याने गुजरात टायटन्सला काहीही फरक पडणार नसल्याचं वक्तव्य केलं आहे. संघाताली कोणालाही हार्दिकच्या फ्रँचाईजी सोडण्याची खंत नसल्याचं शमीने म्हटलंय. हार्दिक पांड्याला जायचं होतं, आणि तो गेला. एक कर्णधार म्हणून त्याने चांगली कामगिरी केली. गुजरातला दोनदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचवलं. तर हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने पहिल्याच प्रयत्नात जेतेपदही पटकावल्याचं शमीने म्हटलं आहे. 

कर्णधार म्हणून दमदार कामगिरी
हार्दिक पांड्याच्या समावेशामुळे पाचवेळा जेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सची बाजू भक्कम बनली आहे. आयपीएलच्या नव्या हंगमात हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा नाव कर्णधार असणार आहे. आयपीएलमध्ये पदार्पणातच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने जेतेपद पटकावलं. आयपीएलच्या  दुसऱ्या हंगामातही गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत धडक मारली. पण चेन्नई सुपर किंग्सने गुजरातवर मात करत पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं.

शमीची आयपीएलमधली कामगिरी
मोहम्मद शमीने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये शमी आतापर्यंत 110 सामने खेळला आहे. यात त्याने तब्बल 127 विकेट घेतल्या आहेत. अकरा धावात चार विकेट ही मोहम्मद शमीची आयपीएलमधली सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. तर 74 धावाही त्याने केल्या आहेत. शमीने राजस्थान रॉयल्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं, आता तो गुजराज टायटन्स संघासाठी खेळतो.