'तू बेहरा आहेस का..' Live मॅचमध्ये ऋषभ पंत अंपायरशी भांडला, पंत लबाड आणि बेईमान आहे का? चाहत्यांचा सवाल

Rishabh Pant Video : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आयपीएल सामन्यादरम्यान पंतच्या एका कृत्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. लाइव्ह सामन्या दरम्यान पंतची पंचांशी भांडण झालं आणि चाहत्यांनी तो लबाड आणि बेईमान आहे का? असा प्रश्न विचारालाय. 

नेहा चौधरी | Updated: Apr 13, 2024, 12:47 PM IST
 'तू बेहरा आहेस का..' Live मॅचमध्ये ऋषभ पंत अंपायरशी भांडला, पंत लबाड आणि बेईमान आहे का? चाहत्यांचा सवाल title=
ipl 2024 lsg vs dc watch rishabh pant live match argument with umpire video viral pant might get banned from the next match

IPL 2024, LSG vs DC : आयपीएलमध्ये अखरे दिल्ली कॅपिटल्सने (DC) आपला पहिला विजय मिळवला. लखनऊ सुपर जायंट्स (LSG) वर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला खरा पण हा मॅच दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंताच्या त्या कृतीमुळे चर्चेत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत 4 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. पण ऋषभ पंतने लाइव्ह मॅचमध्ये अंपायरशी घातलेल्या वादामुळे अडचणीत सापडला आहे. एवढंच नाही तर ऋषभ पंतने अंपायरशी केलेले भांडण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर ऋषभ पंत सोशल मीडियावर ट्रोल होतो आहे. पंतच्या या कृतीची शिक्षा म्हणून पुढच्या मॅचमध्ये त्याला बंदी घालण्यात येईल अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. (ipl 2024 lsg vs dc watch rishabh pant live match argument with umpire video viral pant might get banned from the next match)

लाइव्ह मॅचमध्ये ऋषभ पंत अंपायरशी भिडला

झालं असं की, दिल्लीचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने क्विंटन डी कॉकला एलबीडब्ल्यू आऊट करुन संघासाठी पहिलं यश मिळवलं. अहमदनंतर इशांत शर्माला बॉलिंग देण्यात आली. देवदत्त पडिक्कल त्यावेळी स्ट्राइकवर होता. इशांतने बॉल टाकला आणि अंपायरने तो वाईड असल्याच सांगितलं. त्यानंतर ऋषभ पंतने संघाच्या खेळाडूंशी एकत्र बोलत असताना त्याने असे हातवारे केले की,  मैदानावरील पंचांना वाटले की तो डीआरएस मागत आहे. यानंतर मैदानावरील पंचांनी ताबडतोब तिसऱ्या पंचाकडे रिव्ह्यू मागितला.

 

हेसुद्धा वाचा - Video : 6,6,6,6,6...जेक फ्रेझर मॅकगर्क आहे तरी कोण? 21 वर्षांच्या पठ्ठ्यानं डिव्हिलियर्सचाही मोडलाय विक्रम

या घटनेनंतर ऋषभ पंत बराच वेळ मैदानावरील अंपायशी वाद घालताना दिसला. ऋषभ पंतने अंपायला जाब विचारला की, मी रिव्ह्यू मागितला नव्हता, मग तुम्ही कोणत्या आधारावर निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवला?  

त्यानंतर रिप्ले पाहिल्यावर ऋषभ पंतने रिव्ह्यू घेण्याचे संकेत दिल्याचे स्पष्टपणे दिसल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले. पण अंपायरऐवजी ऋषभ पंत कोणत्या तरी खेळाडूला हे संकेत देत असल्याच काही लोकांचं आणि पंतच म्हण आहे. पण कोणत्याही खेळाडूला सांगण्याची ही पद्धत ऋषभ पंतवर महागात पडली आणि सोबतच दिल्लीने एक रिव्ह्यू गमावला. 

 

चाहत्यांकडून पंत ट्रोल 

ऋषभ पंतच्या या बालिश कृत्यामुळे डगआउटमधील सौरभ गांगुली आणि रिकी पाँटिंगही संतापले. सोशल मीडियावर पंतचा मैदानातील हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर चाहत्यांकडून पंत ट्रोल झाला आहे. ऋषभ पंतच्या कृतीनंतर त्याला सर्वात मोठा फसवणूक करणारा टॅग चाहत्यांनी दिला आहे.

ऋषभ पंतबद्दल सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहे. तर काही यूजर्सने त्याच्यावर पुढच्या मॅचवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.