एका तासात मोडला आयपीएलचा इतिहास; 'या' खेळाडूवर लागली सर्वाधिक 24.75 कोटींची बोली

IPL 2024 Auction: दुबईत सुरू असलेल्या आयपीएल लिलावात दोन गोलंदाजांवर मोठी रक्कम लावली गेली. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क (Michell Starc)याला तब्बल 24.75 कोटींची बोली लागली आहे.

सौरभ तळेकर | Updated: Dec 19, 2023, 04:35 PM IST
एका तासात मोडला आयपीएलचा इतिहास; 'या' खेळाडूवर लागली सर्वाधिक 24.75 कोटींची बोली  title=
IPL 2024 Auction Mitchell Starc

IPL 2024 Auction Mitchell Starc: दुबईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल लिलावात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला हैदराबादने 20.50 कोटी रूपयाला खरेदी केलं होतं. कमिन्स हा आयपीएल इतिहासातील सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला होता. मात्र हा इतिहास अवघ्या तासाभरात मोडला. ऑस्ट्रेलियाच्याच मिचेल स्टार्कने तब्बल 24.75 कोटींच्या रकमेत त्याला संघात सामील करून घेतलं आहे.

मिचेल स्टार्कची मुळ किंमत 2 कोटी होती. त्याला संघात सामील करून घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात जोरदार लढाई सुरू होती. त्यानंतर लिलावात एन्ट्री मारली ती कोलकाता आणि गुजरात या दोन्ही संघांनी... दोघांनी अखेरपर्यंत सोडलं नाही. अखेर 24 कोटी 75 लाख रूपयांना कोलाकाता नाईट रायडर्स संघाने खरेदी केलं. त्यामुळे आता स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

कोलकाताने आत्तापर्यंत तीन खेळाडूंवर बोली लगावली. यामध्ये विकेटकिपर केएस भरत आणि चेतन साकरिया यांचा समावेश आहे. या दोन्ही खेळाडूंना कोलकाताने त्यांच्या बेस प्राईजवर खरेदी केलंय.

विकल्या गेलेल्या खेळाडूंची यादी

1. रोवमैन पॉवेल (वेस्टइंडीज)- 7.40 करोड़, राजस्थान रॉयल्स (बेस प्राइस- 1 करोड़)
2. हैरी ब्रूक (इंग्लैंड)- 4 करोड़, दिल्ली कॅपिटल्स (बेस प्राइस- 2 करोड़)
3. ट्रेविस हेड (ऑस्ट्रेलिया)- 6.80 करोड़, सनराइजर्स हैदराबाद (बेस प्राइस- 2 करोड़)
4. वानिंदु हसारंगा (श्रीलंका)- 1.50 करोड़, सनराइजर्स हैदराबाद (बेस प्राइस- 1.5 करोड़)
5. रचिन रवींद्र (न्यूजीलंड)- 1.80 करोड़, चेन्नई सुपर किंग्स (बेस प्राइस- 50 लाख)
6. शार्दुल ठाकुर (भारत)- 4 करोड़, चेन्नई सुपर किंग्स (बेस प्राइस- 2 करोड़)
7. अजमतुल्लाह उमरजई (अफगानिस्तान)- 50 लाख, गुजरात टाइटन्स (बेस प्राइस- 50 लाख)
8. पैट कमिंस (ऑस्ट्रेलिया)- 20.50 करोड़, सनराइजर्स हैदराबाद (बेस प्राइस- 2 करोड़)
9. गेराल्ड कोएत्जी (साउथ अफ्रीका)- 5 करोड़, मुंबई इंडियंस (बेस प्राइस- 2 करोड़)
10. हर्षल पेटल (भारत)- 11.75 करोड़, पंजाब किंग्स ((बेस प्राइस- 2 करोड़)
11. डेरिल मिचेल (न्यूजीलैंड)- 14 करोड़, चेन्नई सुपर किंग्स (बेस प्राइस- 1 करोड़)
12. क्रिस वोक्स (इंग्लैंड)- 4.20 करोड़, पंजाब किंग्स (बेस प्राइस- 2 करोड़)
13. ट्रिस्टन स्टब्स (साउथ अफ्रीका)- 50 लाख, दिल्ली कैपिटल्स (बेस प्राइस- 50 लाख)
14. केएस भरत (भारत)- 50 लाख, कोलकाता नाइट राइडर्स (बेस प्राइस- 50 लाख)
15. चेतन सकारिया (भारत)- 50 लाख, कोलकाता नाइट राइडर्स (बेस प्राइस- 50 लाख)
16. अल्जारी जोसेफ (वेस्टइंडीज)- 11.50 करोड़, रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु (बेस प्राइस- 1 करोड़)
17. उमेश यादव (भारत)- 5.80 करोड़, गुजरात टाइटन्स (बेस प्राइस- 2 करोड़)
18. शिवम मावी (भारत)- 6.40 करोड़, लखनऊ सुपर जायंट्स (बेस प्राइस- 50 लाख)
19. मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)- 24.75 करोड़, कोलकाता नाइट राइडर्स (बेस प्राइस- 2 करोड़)
20. जयदेव उनादकट (भारत)- 1.6 करोड़, सनराइजर्स हैदराबाद (बेस प्राइस- 50 लाख)
21. दिलशान मदुशंका (श्रीलंका)- 4.60 करोड़, मुंबई इंडिंयंस (बेस प्राइस- 50 लाख)