IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चं स्वप्न या वर्षी पूर्ण होणार? यंदा काय आहे संघाची ताकद

RCB Squad in IPL 2023: दिग्गज आणि अनुभवी खेळाडू, पण अद्याप जेतेपदापासून दूर.. ही आहे आयपीएलमधल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची स्थिती. गेल्या पंधरा हंगामात आरसीबीला एकदाही आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरता आलेलं नाही

Updated: Mar 30, 2023, 03:46 PM IST
IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चं स्वप्न या वर्षी पूर्ण होणार? यंदा काय आहे संघाची ताकद title=

RCB Squad in IPL 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची तयारी पूर्ण झालीय. स्पर्धेतील सर्व दहा संघांची रणनिती पूर्ण झाली आहे आणि चाहतेही आपल्या आवडत्या संघाला चिअर करण्यासाठी सज्ज झालेत. यंदा कोणता संघ बाजी मारणार याची स्पर्धेआधीच चर्चा सुरु झाली आहे. यंदा विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या संघांमध्ये पहिलं नाव आहे ते रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचं (Royal Challengers Bangalore). यंदा आरसीबी (RCB) नव्या रणनितीसह मैदानात उतरत आहे. फाफ डूप्लेसीच्या (Faf du Plessis) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीत विराट कोहली (Virat Kohli), ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell), दिनेश कार्तिकसारखे (Dinesh Kartik) अनुभवी खेळाडू आहेत.

आतापर्यंत जेतेपदापासून दूर
आयपीएलच्या गेल्या पंधरा हंगामात आरसीबीला अद्याप एकदाही आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरता आलेलं नाही.  आयपीएलच्या गेल्या हंगामात आरसीबीने 14 पैकी 8 सामने जिंकले आणि चौथ्यांदा क्वालीफाईंग राऊंडमध्ये प्रवेश केला. पण अंतिम फेरीत प्रवेश करण्यात आरसीबीला यश आलं नाही. यंदा आरसीबी विराट कोहलीच्या नाही तर फाप डूप्लेसीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. पण स्पर्धेआधीच आरसीबीला एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख खेळाडू जोश  हेजलवूडच्या खेळण्यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही हेजलवूड खेळला नव्हता.

कोणत्या परदेशी खेळाडूला संधी मिळणार?
जोश हेजलवूडच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह असलं तरी न्यूझीलंडचा ऑलराऊंड मायकल ब्रेसवेल संघात आरसीबीत सामिल झालेला आहे. फलंदाजीबरोबर गोलंदाजीमध्येही ब्रेसवेल माहिर आहे. पण संघात केवळ चार परदेशी खेळाडूंना घेता येत नाहीत. अशात ग्लेन मॅक्सवेल, रीस टोप्ले, वानिंदु हसरंगा आणि हेजलवूड यांना संधी दिल्यास ब्रेसवेलला अंतिम अकरामध्ये स्थान मिळणं कठिण आहे. आरसीबीसमोर आणखी एक समस्या म्हणजे ग्लेन मॅक्सवेलचा फॉर्म. दुखापतीनंतर मॅक्सवेल पुनरागमन करतो. भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही मॅक्सवेल केवळ एकच सामना खेळला होता. 

विराट कोहली फॉर्मात
आरसीबीसाठी एक चांगली गोष्ट म्हणजे संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. गेल्या काही सामन्यात विराटने खोऱ्याने धावा केल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्ये विराटच्या खात्यात एकही शतक नव्हतं. पण आशिया कप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध विराटने शानदार शतकं ठोकलं. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यातही विराटने शतक लगावलं होतं. त्यामुळे त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. संघाला यंदा जेतेपद मिळवून देण्यासाठी विराटचा फॉर्म महत्त्वाचा ठरणार आहे. 

गोलंदाजीत कम-जादा
आरसीबीसाठी गोलंदाजीतही एक चांगली गोष्ट म्हणजे संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद सिराजही फॉर्मात आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सिराजने दमदार कामगिरी केली होती. आयपीएलमध्ये सिराजला साथ मिळणार आहे ती हर्षल पटेलची. पण तिसरा वेगवान गोलंदाज कोण असणार ही संघासमोरची मोठी समस्या आहे. फिरकीची जबाबदारी श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू वानिंदु हसरंगावर असणार आहे. आरसीबीचे सात सामने हे घरच्या मैदानावर होणार आहेत. त्यामुळे यंदाही क्वालिपाय राऊंडपर्यंत मजल मारण्याची शक्यता आहे. 

आरसीबी संघ
फाफ डु प्लेसिस (कर्णधाक), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, वानिंदु हसरंगा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, रजत पाटीदार, अनुज रावत, आकाश दीप, जोश हेजलवुड, महिपाल लोमरोर, फिन एलेन, सुयश प्रभुदेसाई, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, डेविड विली, रीस टोप्ले, हिमांशु शर्मा, मनोज भांडगे, राजन कुमार, अविनाश सिंह, सोनू यादव, माइकल ब्रेसवेल