IPL 2023: 'केएल राहुलची बॅटिंग बघणं म्हणजे...' केविन पीटरसनच्या वक्तव्याने क्रीडा जगतात खळबळ

Kevin Pietersen: इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरनस यंदाच्या आयपीएलमध्ये कॉमेंट्री करतोय. बुधवारी लखनऊ आणि राजस्थानदरम्यान सामना रंगला. यात त्याने केलेल्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. 

Updated: Apr 20, 2023, 03:45 PM IST
IPL 2023: 'केएल राहुलची बॅटिंग बघणं म्हणजे...' केविन पीटरसनच्या वक्तव्याने क्रीडा जगतात खळबळ title=

IPL 2023: आयपीएलचा सोळावा हंगाम सुरु असून अनेक दिग्गज क्रिकेटपटू यंदा कॉमेंट्रेटरची (Commentary) भूमिका बजावताना दिसत आहेत. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनचाही (Kevin Pietersen) यात सहभाग आहे. पण पीटरसन सोशल मीडियावर (Social Media) अचानक चर्चेत आला आहे, त्याच्या एका वक्त्तव्याने (Controversial Statement) क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. बुधवारी लखनऊ सुपर जायंट्स (lucknow super giants) आणि राजस्थान रॉयल्सदरम्यान (rajasthan royals) सामना खेळला गेला. या सामन्याची कॉमेंट्री करताना केविन पीटरसनने एक अशी कमेंट केली ज्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते संतप्त झाले आहेत. 

लखनऊ वि. राजस्थान सामना
आयपीएल स्पर्धेत काल 26 वा सामना खेळला गेला. केएल राहुलच्या (KL Rahul) लखनऊ सुपर जायंट्स आणि संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सदरम्यान हा सामना रंगला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात लखनऊने राजस्थानवर दहा धावांनी मात केली. लखनऊचा विजय झाला असला तरी कर्णधार केएल राहुलला ट्रोल केलं जात आहे. याचं कारण म्हणजे त्याची संथ फलंदाजी. सलामीला आलेल्या राहुलने 39 धावा केल्या, पण यासाठी तो तब्बल 32 चेंडू खेळला. यात त्याने 4 चौके आणि 1 सिक्स लगावला. राहुलच्या याच संथ फलंदाजीवर कॉमेंट्रेटर केविन पीटरसने एक कमेंट केली. 

पीटरसनचं वादग्रस्त वक्तव्य
केएल राहुल फलंदाजी करत असताना केविन पीटरसनने राहुलची बॅटिंग बघण्यासाठी बोअरिंग असल्याचं म्हटलं आहे. या कमेंटमुळे क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. केएल राहुलला पॉवर प्लेमध्ये फलंदाजी करताना बघणं, हे मी आतापर्यंतच सर्वात बोअरिंग काम केल्याचं पीटरसनने म्हटलं आहे. पीटरसनचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

केएल राहुलने दिलं स्पष्टिकरण
आपल्या संथ  फलंदाजीवर सामना संपल्यानंतर केएल राहुलने स्पष्टीकरण दिलं आहे. जयपूरचं सवाई मानसिंग मैदानाची खेळपट्टी मध्यगती गोलंदाजांना साथ देणारी होती, तसंच त्यावर चेंडूला उसळी कमी होती, त्यामुळे जपून फलंदाजी करावी लागत असल्याचं राहुलने सांगितलं. हा सामना तास कमी धावांचा झाला. पहिली फलंदाजी करणाऱ्या लखनऊने राजस्थानसमोर विजयासाठी केवळ 155 धावांचं लक्ष ठेवलं होतं. पण इतकं सोप लक्षही गाठताना राजस्थानची दमछाक झाली आणि राजस्थानचा संघ 144 धावाच करु शकला. शेवटच्या षटकात आवेश खाने दमदार गोलंदाजी करत लखनऊला मोठा विजय मिळवून दिला.