IPL Auction 2023: विरेंद्र सेहवागच्या भाच्याची आयपीएलमध्ये एन्ट्री; कोटींची लागली बोली

आयपीएलच्या 16 व्या सिझनचं आज मिनी ऑक्शन (IPL Auction 2023) पार पडलं. कोचीच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये हे ऑक्शन झालं होतं. ज्यामध्ये अनेक खेळाडूंवर आज बोली लावण्यात आली. 

Updated: Dec 23, 2022, 09:32 PM IST
IPL Auction 2023: विरेंद्र सेहवागच्या भाच्याची आयपीएलमध्ये एन्ट्री; कोटींची लागली बोली title=

Mayank Dagar In IPL : आयपीएलच्या 16 व्या सिझनचं आज मिनी ऑक्शन (IPL Auction 2023) पार पडलं. कोचीच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये हे ऑक्शन झालं होतं. ज्यामध्ये अनेक खेळाडूंवर आज बोली लावण्यात आली. याचदरम्यान टीम इंडियाचा अनकॅप्ड प्लेअर मयांक डागर (Mayank Dagar) याने देखील 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये आपलं नाव नोंदवलं होतं. इतकंच नाही तर मयांकला कोटी रूपयांची बोली लावण्यात आली. मयांक हा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागचा भाचा आहे.

Mayank Dagar ला सनरायझर्स हैदराबादने केलं खरेदी

भारतीय दिग्गज ओपनर खेळाडू फलंदाज विरेंद्र सेहवागचा भाचा मयांक डागर आहे. आयपीलएल 2023 च्या मिनी ऑक्शनमध्ये सनरायझर्स हैदराबादने 1.30 कोटी रूपयांची बोली लावून खरेदी केलं. 

राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स यांच्यामध्ये या खेळाडूसाठी चांगंल बिडिंग वॉर पहायला मिळाला. अखेरीस सनरायझर्स हैदराबादने बाजी मारली आणि याला आपल्या ताफ्यामध्ये घेतलं. मयांकला त्याच्या बेस प्राईसपेक्षा 1.60 कोटी रूपये अधिक मिळाले. 

सॅम करन ठरला सर्वात महागडा खेळाडू

इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर सॅम करनला (Sam Curran) आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली आहे. सॅम करनला पंजाब किंग्जने (Panjab Kings) तब्बल 18 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केलं आहे. त्यासाठी मुंबई इंडियन्स (Mumbai indians) आणि राजस्थान रॉयल्स (Rajastan royals) यांच्यात भिडत लागली होती. मात्र, अचानक पंजाब किंग्जने (Panjab Kings) ऑक्शनमध्ये उडी मारली आणि सॅम करनला आपल्या ताफ्यात घेतलं.

आयपीएल 2021च्या लिलावात मॉरिसवर 16.25 कोटी इतकी बोली लावली होती. राजस्थान रॉयल्सने त्याला संघात घेतलं होतं. युवराजला 2015 साली 16 कोटींना दिल्ली संघाने खरेदी केलं होतं. पंजाबला एकदाही ट्रॉफी जिंकता आलं नाही. त्यामुळे आता सॅम करनच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागलंय.