Anushka Sharma Reaction on Virat Kohli Century : गुजरात टायटन्सविरुद्धच्या करा किंवा मरोच्या सामन्यात विराट कोहलीने कमाल बँटिंग केली. त्याने या सीझनमध्ये दुसरं शतक ठोकत विक्रम केला. आयपीएल 2023 या सीझनमधील तो असा विक्रम करणार पहिला खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या करिअरमधील किंग कोहलचे हे सातवं शतक आहे. त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. विराट कोहलीने 61 बॉसमध्ये नाबाद 101 रन्स केले. यामध्ये विराट कोहलीने 13 फोर आणि एक सिक्स लगावला.
King Kohli - the ton machine! pic.twitter.com/YZojNHGG9m
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 21, 2023
या विक्रमानंतर विराटची अर्धागिनी बॉलीवूड सुपरस्टार अनुष्का शर्मा पतीला स्टँडवरून चिअर करताना दिसून आली. अनुष्काला सगळ्यांसमोर त्याचा खेळासाठी फ्लाइंग किस दिली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तर मैदानात हार्दिक पांड्याने मिठी मारत विराटच्या शतकाचं कौतुक केलं. विशेष म्हणजे त्याचा विक्रम विराटने मोडला त्या ख्रिस गेल याने समालोचन करताना त्याचे भरपूर कौतुक केले.
Back to Back Hundreds for Virat Kohli in #TATAIPL 2023
Take a bow #RCBvGT | @imVkohli pic.twitter.com/p1WVOiGhbO
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2023
शिखर धवन आणि जोस बटलर यांच्यानंतर आयपीएलमध्ये शकतं ठोकणारा तो तिसरा खेळाडू आहे. आयपीएलच्या या सिझनमध्ये आतापर्यंत विराट कोहली 14 सामने खेळा आहे. या सामन्यात किंग कोहलीने सहाशेपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतकं आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. 45 ची सरासरी आणि 136 च्या स्ट्राईक रेटने विराटने कमाल केली आहे. त्यामुळे ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत विराट कोहली सध्या दुसऱ्या नंबर असून पहिल्या नंबरवर आरसीबीचा फाफ डु प्लेसिस हा खेळाडू आहे. (ipl 2023 anushka sharma gives flying kiss to virat kohli hardik pandya hugged virat most centuries in the history of the ipl video viral trend now)
Anushka Virat pic.twitter.com/19qZ9bf00l
— Shaunak Ghosh (@ShaunakGhosh94) May 21, 2023
आयपीएल 2023 मध्ये एक अजून विक्रमाची नोंद झाली आहे. यंदा या सीझनमध्ये सर्वाधिक 9 शतकं खेळाडूंनी ठोकले आहेत. यामध्ये दोन शकतं विराटने केलं तर हॅरी ब्रूक, हेनरिक क्लासेन आणि कॅमरुन ग्रीन, वेंकटेश अय्यर, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांनी यंदा शतकी खेळी केली आहे.
विराटचं शतक आणि विक्रम मात्र टीमच्या कामी आलं नाही. शुभमन गिल अखेरच्या बॉलवर सिक्स मारत गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) विजय मिळवून दिला.