कोणत्या 3 टीम Playoff पर्यंत पोहोचणार? बंगळुरूच्या पराभवानंतर समजून घ्या गणित

आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 आणि 5 ट्रॉफी मिळवणाऱ्या चेन्नई आणि मुंबई टीम यंदा मात्र या स्पर्धेत कुठेच नाहीत.

Updated: May 14, 2022, 11:20 AM IST
कोणत्या 3 टीम Playoff पर्यंत पोहोचणार? बंगळुरूच्या पराभवानंतर समजून घ्या गणित title=

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात प्लेऑफची स्पर्धा आता अधिक चुरशीची झाली आहे. या सामन्यात गुजरात, लखनऊ आपले स्थान जवळपास निश्चित केलं आहे. आता उर्वरित टीम कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. 

आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 आणि 5 ट्रॉफी मिळवणाऱ्या चेन्नई आणि मुंबई टीम यंदा मात्र या स्पर्धेत कुठेच नाहीत. तर पंजाबने बंगळुरू विरुद्ध सामना जिंकून प्लेऑफमध्ये जाण्याची आशा वाढली आहे. 

पंजाब विरुद्ध सामना पराभूत झाल्यानंतर बंगळुरूचं प्लेऑफमध्ये पोहोचणं कठीण झालं आहे. टीमचा हा 13 सामन्यात 6 वा पराभव आहे. पंजाब टीमकडे आता 14 गुण आहेत. हैदराबादकडे 10 पॉईंट्स आहेत. त्यामुळे आणखी दोन सामन्यांनंतर प्लेऑफचं चित्र अधिक स्पष्ट होईल. 

पॉईंट टेबलवर 16 गुण घेऊन गुजरात पहिल्या स्थानावर आहे. लखनऊ दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर राजस्थान आहे. तर चौथ्या स्थानावर बंगळुरू आहे. दिल्ली, पंजाब, हैदराबाद 

लखनऊ, राजस्थान टीम अगदी सहज प्लेऑफ स्पर्धेत पोहोतील अशी क्रिकेटप्रेमींना आशा आहे. आता तिसरी टीम कोणती पोहोचणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.