टीमचे 4 कोटी पाण्यात, खेळाडूला रिटेन करून राजस्थानवर का आलीय पश्चातापाची वेळ

राजस्थान टीमवर पश्चातापाची वेळ, तिन्ही सामन्यात घडला असा प्रकार की....

Updated: Apr 6, 2022, 11:32 AM IST
टीमचे 4 कोटी पाण्यात, खेळाडूला रिटेन करून राजस्थानवर का आलीय पश्चातापाची वेळ title=

मुंबई : बंगळुरु विरुद्घ झालेल्या सामन्यात राजस्थानला पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानचा पहिला पराभव आहे. या पराभवानंतर संजू सॅमसन टीममधील खेळाडूंवर संतापला होता. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बंगळुरूने 4 विकेट्सने राजस्थानचा पराभव केला. 

राजस्थान संघाची सुरुवात अत्यंत वाईट झाली. राजस्थानच्या युवा खेळाडूला मोठी रक्कम देऊन रिटेन केलं होतं. मात्र तो तिन्ही सामन्यात फ्लॉप ठरला. या हंगामात तो सतत फ्लॉप ठरत असल्याने टीमसाठी अडचणीचं ठरत आहे. 

पराभवानंतर राजस्थान टीम पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. टीममध्ये सर्वात मोठं टेन्शन ओपनरचं आहे. यशस्वी जायसवाल तिन्ही सामन्यात फ्लॉप ठरला. त्याचा फटका टीमला बसला आहे. यशस्वीने केवळ 4 धावा केल्या. त्यामुळे टीम अडचणीत येते. 

यशस्वीला 4 कोटी रुपये देऊन टीममध्ये रिटेन केलं. त्याने 3 सामन्यात 40 धावा केल्या. यंदाच्या हंगामात त्याची विशेष कामगिरी दिसली नाही.  2021 मध्ये 10 सामन्यात त्याने 249 धावा केल्या होत्या. त्याच जोरावर टीममध्ये त्याला रिटेन केलं. मात्र तो सोडून इतर खेळाडू खूप चांगले खेळताना दिसत आहे. संजू सॅमसन त्याच्याबद्दल पुढच्या सामन्यात काय निर्णय घेणार पाहावं लागणार आहे.