IPL 2022 | "बुमराह एकटा...", दिग्गज खेळाडू रोहित शर्मावर संतापला

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम अशी मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) ओळख आहे. मात्र मुंबईला यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. 

Updated: Apr 9, 2022, 08:43 PM IST
IPL 2022 | "बुमराह एकटा...", दिग्गज खेळाडू रोहित शर्मावर संतापला title=

 मुंबई : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम अशी मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) ओळख आहे. मात्र मुंबईला यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबईला या मोसमात अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही.  यामुळे स्वत: कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) निराश आहे. या दरम्यान टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan) रोहित संतापला आहे. (ipl 2022 rcb vs mi irfan pathan on mumbai indians jasprit bumrah rohit sharma)

मुंबई इंडियन्स अजूनही आयपीएल 2022 मध्ये कमबॅक करु शकते. असा विश्वास इरफान पठाणने व्यक्त केला. पण जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त चांगल्या गोलंदाजांच्या अनुपस्थितीमुळे मुंबईला तोटा सहन करावा लागतोय. टीममध्ये बुमराह हा एकमेव चांगला गोलंदाज आहे. मात्र त्याला पाठिंबा देण्यासाठी कोणीही उपस्थित नाही, असंही इरफानने स्पष्ट केलं. 

इरफान काय म्हणाला? 

'मुंबईला प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कमबॅक कसं करायचं हे माहित आहे. मुंबईने याआधी 2014 आणि 2015 मध्येही असंच कमबॅक केलं होतं. यंदा मुंबईकडे जसप्रीत बुमराहला चांगली साथ देऊ शकेल असा गोलंदाज नाही. कर्णधारासाठी ही मोठी डोकेदुखी आहे", असंही इरफान नमूद केलं. तो  स्टार स्पोर्ट्सवरील 'क्रिकेट लाइव्ह' या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळेस तो बोलत होता. 

पॉइंट्सटेबलमध्ये शेवटच्या स्थानी 

मुंबईने आयपीएलच्या 15 व्या मोसमात आतापर्यंत एकूण 3 सामने खेळले आहेत. मुंबईला या तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई पॉइंट्सटेबलमध्ये सर्वात शेवटी म्हणजेच दहाव्या स्थानी आहे.  मुंबईच्या विजयाची प्रतिक्षा अजूनही संपलेली नाही. मुंबईचा या मोसमातील चौथा सामना हा आरसीबी विरुद्ध खेळवण्यात येत आहे. या सामन्यात मुंबईचं विजयातं खातं उघडण्याचा मानस असणार आहे.