RCB Captain in IPL 2022 : आयपीएल 2022 सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. आयपीएलच्या 15 व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व कोण करणार, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. गेल्या सीजनमध्ये विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या सीजनमध्ये आरसीबीसमोर नवीन कर्णधार शोधण्याचे आव्हान आहे.
दिनेश कार्तिक, फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल ही 3 नावे कर्णधारपदाच्या शर्यतीत आहेत. पण आरसीबीने डु प्लेसिसला कर्णधार बनवण्याचे संकेत दिले आहेत.
आरसीबीने त्यांच्या ऑफिशिअल ट्विट हँडलवर एक फोटो ट्विट केला आहे ज्याच्या कॅप्शनमध्ये भविष्याचे चित्र असे लिहिले आहे. या फोटोत विराट कोहलीसोबत फाफ डू प्लेसिस दिसत आहे. त्यामुळे आयपीएलच्या 15 व्या सीजनमध्ये फाफ आणि विराट कोहली बंगळुरूसाठी सलामी देताना दिसू शकतात.
फाफ डू प्लेसिसने दीर्घकाळ दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे त्याच्याकडे संघाची कमान सोपवली जाऊ शकते.
नुकताच आरसीबीने एक व्हिडिओ जारी केला. यामध्ये आरसीबीचे कोचिंग डायरेक्टर माईक हेसन डुप्लेसिसच्या नेतृत्व क्षमता आणि संघासाठी त्याचे महत्त्व याबद्दल बोलताना दिसत आहेत.
Just a picture from the future.
Excited to see thesestars in a partnership, 12th Man Army? #PlayBold #WeAreChallengers #IPL2022 pic.twitter.com/NB7NpogCWE
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 2, 2022
आरसीबीला दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसकडून खूप आशा आहेत, जो एकेकाळी एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचा मजबूत आधारस्तंभ होता. डू प्लेसिस हा आरसीबीचा नवा कर्णधार होऊ शकतो, असे संकेतही फ्रेंचायझीने रविवारी दिले आहेत. फाफ डू प्लेसिसला आरसीबीने 7 कोटी रुपयांना विकत घेतले होते.