मुंबई : टीम इंडियातून बाहेर झाल्यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांना आणखी एक झटका लागला आहे. बीसीसीआयने या दोन्ही खेळाडूंची ग्रेड कमी केली आहे. हे दोन्ही खेळाडू आता ए वरुन बी ग्रेडमध्ये ठेवण्यात आले आहेत. टीम इंडियात संधी मिळूनही खराब कामगिरीमुळे दोन्ही खेळाडूंना संघातून बाहेर करण्यात आलं होतं. त्यानंतर आता त्यांच्या ग्रेडवर ही परिणाम झाला आहे.
पुजारा आणि रहाणे या दोन्ही खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतूनही वगळण्यात आले आहे. सर्वात मोठी घसरण दुखापतग्रस्त अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या ग्रेडमध्ये झाली आहे. तो ग्रेड ए वरून थेट सी ग्रेडमध्ये ढकलला गेलाय.
करारानुसार, A+ ग्रेडमध्ये कोणताही बदल झालेला नाही तर B श्रेणीतील 10 पैकी पाच खेळाडूंना वगळण्यात आले आहे. बी श्रेणी वाढविण्यात आली आहे. या श्रेणीतील खेळाडूंची संख्या 5 वरून सात करण्यात आली आहे. त्याचबरोबर आणखी दोन खेळाडूंचा सी ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला असून त्यांची संख्या 12 झाली आहे.