IPL 2022, MI vs RR | मुंबईचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) सुरुवात होणार आहे.

Updated: Apr 2, 2022, 03:17 PM IST
IPL 2022, MI vs RR | मुंबईचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय title=

मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आज (2 एप्रिल) क्रिकेट चाहत्यांना डबल हेडरचा थरार अनुभवायला मिळणार आहे. या डबल हेडरमधील पहिला सामना हा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. मुंबईने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर सुरुवात होणार आहे.  (ipl 2022 mi vs rr mumbai indians win toss and elect to bowl against rajasthan royals)

दोन्ही संघांनी या मोसमातील आपला पहिला सामना खेळला आहे. राजस्थानने विजयी सलामी दिली. तर मुंबईला यंदाही पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे राजस्थानचा विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा मानस असणार आहे. तर मुंबई आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असणार आहे.

हेड टु हेड

उभय संघात आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 24 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये मुंबई वरचढ राहिली आहे. मुंबईने राजस्थानवर 13 वेळा विजय मिळवला आहे. तर राजस्थानने 11 वेळा मुंबईला उपट दिली आहे. 

तसेच या दोन्ही संघात गेल्या 5 सामन्यांमध्येही मुंबईचाच वरचष्मा राहिला आहे. मुंबईने या 5 पैकी सामन्यात विजय मिळवलाय. तर राजस्थान 2 वेळा विजयी ठरला आहे.

सूर्यकुमारची एन्ट्री नाहीच

राजस्थान विरुद्धच्या या सामन्यातून मुंबईचा स्टार बॅट्समन सूर्यकुमार यादवचं टीममध्ये कमबॅक होण्याची शक्यता होती. मात्र या सामन्यातही सूर्यकुमार यादवला संधी मिळालेली नाही. मुंबई आहे त्याच टीमसोबत उतरणार आहे, अशी माहिती कॅप्टन रोहित शर्माने दिली.

मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंह, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स आणि बासिल थम्पी. 

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन :  जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू समॅसन (कॅप्टनय/विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेन्ट बोल्ट आणि युजवेंद्र चहल.