Rohit Sharma, IPL 2022 | रोहित शर्माचा मोठ्या रेकॉर्डवर डोळा, हिटमॅन इतिहास रचणार?

 मुंबईचा कॅप्टन 'हिटमन' रोहित शर्माला (Rohit Sharma) इतिहास रचण्याची संधी आहे. रोहितने या सामन्यात 25 धावा करताच तो टी 20 क्रिकेटमध्ये मोठा रेकॉर्ड आपल्या नावे करेल.

Updated: Apr 13, 2022, 05:08 PM IST
Rohit Sharma, IPL 2022 | रोहित शर्माचा मोठ्या रेकॉर्डवर डोळा, हिटमॅन इतिहास रचणार?  title=

पुणे :  आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आज मुंबई (MI) विरुद्ध पंजाब (PBKS) यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबई हा सामना जिंकून विजयाचं खातं उघडण्यासाठी उत्सूक असणार आहे. तर पंजाब विजयी मार्गावर परण्यासाठी प्रयत्न करेल. मुंबईचा कॅप्टन 'हिटमन' रोहित शर्माला (Rohit Sharma) इतिहास रचण्याची संधी आहे. रोहितने या सामन्यात 25 धावा करताच तो टी 20 क्रिकेटमध्ये मोठा रेकॉर्ड आपल्या नावे करेल. (ipl 2022 mi mumbai indias captain rohit sharma have needed 25 runs for complte 10 thousand t 20 runs)

रोहितचा या रेकॉर्डवर डोळा

रोहित या सामन्यात पंजाब विरुद्ध 25 धावा करतात त्याच्या टी 20 क्रिकेट कारकिर्दीतील 10 हजार धावा पूर्ण होतील. यासह रोहित टी 20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा दुसरा भारतीय तर एकूण 7 वा फलंदाज ठरेल.

टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 10 हजार धावांचा टप्पा पार करणारा विराट कोहली (Virat Kohli) हा एकमेव फलंदाज आहे. त्यामुळे रोहितला 25 धावा करुन विराटच्या या  विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.

टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा

1. क्रिस गेल (वेस्टइंडीज)  - 14562
2. शोएब मालिक (पाकिस्तान) - 11698 
3. कीरोन पोलार्ड (वेस्टइंडीज) -11474
4. एरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया) -10499
5. विराट कोहली (भारत) -10379
6. डेविड वार्नर (ऑस्ट्रेलिया) -10373
7. रोहित शर्मा (भारत)  - 9975

500 चौकार

रोहितला यासह आयपीएलमध्ये 500 चौकार पूर्ण करण्याची संधी आहे.  रोहित एक चौकार मारताच त्याचे 500 चौकार पूर्ण होतील. आतापर्यंत  शिखर धवन, डेव्हिड वॉर्नर, सुरेश रैना आणि  विराट कोहली या चौघांनी हा कारनामा केला आहे. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांना रोहितकडून पंजाब विरुद्धच्या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.