IPL : धोनीच्या आवडत्या खेळाडूचं संपल करिअर! पुढच्या सिझनमध्ये CSK करणार 'या' खेळाडूंना रिटेन

महेंद्र सिंह धोनीचा हा लाडका खेळाडू 

Updated: Nov 8, 2021, 06:57 AM IST
IPL : धोनीच्या आवडत्या खेळाडूचं संपल करिअर! पुढच्या सिझनमध्ये CSK करणार 'या' खेळाडूंना रिटेन  title=

मुंबई : आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात CSK च्या संघाने KKR चा 27 धावांनी पराभव करत चौथे विजेतेपद पटकावले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली हा संघ संपूर्ण स्पर्धेत प्रेक्षणीय दिसला आणि त्यातील प्रत्येक खेळाडूने शेवटपर्यंत आपले पूर्ण योगदान दिले. पण पुढील हंगामात हा संघ पूर्णपणे बदलणार आहे. कारण आयपीएल 2022 च्या आधी मेगा लिलाव होणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक संघ केवळ 4 खेळाडूंना रिटेन करू शकतात. 

या खेळाडूचं करिअर संपल?

सीएसकेसाठी त्यांचा सर्वात दिग्गज खेळाडू सुरेश रैना पुढील हंगामात खेळताना पाहणे खूप कठीण आहे. CSK ने त्याला IPL 2021 च्या फायनलमध्येही स्थान दिले नाही. त्याच्या जागी रॉबिन उथप्पाला संधी देण्यात आली. रैनाचा गेल्या काही काळापासून खराब फॉर्म आहे. यामुळे त्याला गेल्या काही सामन्यांपासून दूर ठेवण्यात आले होते. पण आता सीएसके पुढील मोसमात रैनाला कायम ठेवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रैना हा धोनीचा सर्वात लाडका खेळाडू मानला जातो पण आता स्वतः कॅप्टन कूल त्याला संधी द्यायला तयार नाही.

या 4 खेळाडूंना करणार रिटेन 

पुढच्या वर्षी सीएसके चार खेळाडूंना रिटेन करणार आहे. त्यामध्ये सुरेश रैनाचे नाव फार कठीण आहे. सर्व प्रथम CSK कर्णधार महेंद्रसिंग धोनीला कायम ठेवणार आहे. दुसऱ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाड यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. त्याचबरोबर फाफ डू प्लेसिसचे नावही तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकते. त्याचवेळी चौथे नाव रवींद्र जडेजाचे असेल. मात्र या चार खेळाडूंमध्ये रैनाचे नाव नाही. 

मिस्टर आयपीएलच्या नावाने लोकप्रिय 

सुरेश रैना हा 'मिस्टर आयपीएल' म्हणून जगभर ओळखला जातो. त्यामागचे कारण म्हणजे त्याचा आयपीएलमधील रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. त्याने या लीगमध्ये 205 सामने खेळले आहेत ज्यात त्याने 32.51 च्या सरासरीने आणि 136.76 च्या स्ट्राइक रेटने 5528 धावा केल्या आहेत. स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण यावर्षी त्याने 12 सामन्यात 17.77 च्या सरासरीने आणि 125.00 च्या स्ट्राईक रेटने फक्त 160 धावा केल्या. या वर्षी त्याने अर्धशतकही केले असले तरी त्याच्या कामगिरीत सातत्य राहिलेले नाही.

या खेळाडूचं IPL करिअर संपणार का? 

धोनीने क्रिकेटला अलविदा केल्यावर 34 वर्षीय सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. रैनासाठी परिस्थिती ठीक चालत नाही, त्यामुळे कदाचित सुरेश रैना सीझन संपताच आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो. या संपूर्ण हंगामात रैनाने ज्या प्रकारचा फॉर्म दाखवला आहे, त्यावरून एक गोष्ट जवळपास स्पष्ट झाली आहे की तो पुढील वर्षी कोणताही संघ खरेदी करण्यात रस दाखवणार नाही. अशा परिस्थितीत त्याची आयपीएल कारकीर्द शेवटच्या दिशेने वाटचाल करत आहे.