मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 6 व्या सामन्याला (IPL 2022) अवघ्या काही मिनिटातच सुरुवात होणार आहे. हा सामना बंगळुरु विरुद्ध कोलकाता (Rcb vs Kkr) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. बंगळुरुचा कॅप्टन फॅफ डु प्लेसिसने (Faf Du Plesis) टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोलकाता पहिले बॅटिंग करुन बंगळुरुला विजयी आव्हान देणार आहे. या सामन्याचं आयोजन नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये ( Dr DY Patil Stadium) करण्यात आलंय. (ipl 2022 match 6 rcb vs kkr banglore win toss and elect to fielding against kolkata)
कोलकातामध्ये एकमेव बदल
केकेआरने प्लेइंग इलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. शिवम मावीच्या जागी टीम साऊथीला संधी देण्यात आली आहे.
कोलकाता प्लेइंग इलेव्हन
श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, आंद्रे रसेल, सॅम बिलिंग्स, सुनील नरेन, शेल्डन जॅक्सन, टीम साउथी, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन
फॅफ डुप्लेसीस (कॅप्टन), अनुज रावत, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शेरफाने रुदरफोर्ड, विराट कोहली, डेव्हिड विली, वानेंदु हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि ए दीप