मुंबई : मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) मोठा धक्का बसला आहे. मुंबईचा स्टार बॉलर दुखापतीमुळे 15 व्या मोसमातून बाहेर पडला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद अर्शद खान संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. अर्शदच्या जागी आता बदली खेळाडू म्हणून कुमार कार्तिकेय सिंहला (Kumar Kartikeya Singh) संधी देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. (ipl 2022 Kumar Kartikeya Singh to replace mohammad arshad khan in mumbai indians squad)
मुंबईने मेगा ऑक्शनमध्ये मध्य प्रदेशच्या अर्शद खानला 20 लाख रुपयात खरेदी केलं होतं. मात्र अर्शद एकही सामना न खेळता टीममधून बाहेर पडला.
अर्शदच्या जागी संधी देण्यात आलेला कार्तिकेय सिंह हा स्पिनर आहे. विशेष म्हणजे कार्तिकेय हा मध्य प्रदेशचं प्रतिनिधित्व करतो. मुंबईने कार्तिकेयासाठी 20 लाख रुपये खर्चून त्याला आपल्या ताफ्यात घेतलं.
कार्तिकेयने आतापर्यंत 9 फर्स्ट क्लास, 19 लिस्ट ए आणि 8 टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 35, 18 आणि 9 विकेट्स घेतल्या आहेत.
मुंबईसाठी आयपीएलचा 15 वा मोसम हा फार खराब राहिला. मुंबईला सलग 8 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मुंबईचं या 15 व्या मोसमातील आव्हान संपुष्टात आलं आहे.