IPL 2022 सुरु होण्याआधी गावस्कारांची भविष्यवाणी, हा खेळाडू करणार 900 हून अधिक धावा

IPL 2022 सुरु होण्याआधी सुनील गावस्कर यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

Updated: Mar 26, 2022, 04:12 PM IST
IPL 2022 सुरु होण्याआधी गावस्कारांची भविष्यवाणी, हा खेळाडू करणार 900 हून अधिक धावा title=

IPL 2022 : आयपीएल 2022 आजपासून सुरू होत आहे. या मोसमातील पहिल्या सामन्यात आज CSK विरुद्ध KKR लढत होणार आहे. आयपीएलच्या सीजन 15 मध्ये यावर्षी 10 संघ एकमेकांशी भिडणार आहेत. त्यामुळे रंगत आणखी वाढणार आहे. ही मोठी लीग सुरू होण्यापूर्वी सुनील गावस्कर यांनी मोठा दावा केला आहे. गावस्कर म्हणाले की, यावर्षी आयपीएलमध्ये एक फलंदाज 900 पेक्षा जास्त धावा करेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) चा कर्णधार बदलल्यामुळे विराट कोहली 2016 च्या हंगामाप्रमाणेच खेळू शकतो. ज्यामध्ये त्याने 900 हून अधिक धावा केल्या होत्या, असा विश्वास भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला. रविवारी, मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर आयपीएल 15 च्या उद्घाटनाच्या सामन्यात आरसीबी पंजाब किंग्ज विरुद्ध खेळणार आहे, तेव्हा कोहली सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल, परंतु यावेळी तो एक खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहे.

आयपीएलचे अधिकृत प्रसारक 'स्टार स्पोर्ट्स'च्या 'गेमप्लान' या एपिसोडमध्ये बोलताना गावस्कर म्हणाले, 'कोहली पुन्हा कर्णधारपदाची धुरा सांभाळेल की नाही, हे सध्या तरी आम्हाला माहीत नाही. कधीकधी जेव्हा एखादा खेळाडू कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त होतो तेव्हा तो इतर 10 खेळाडूंचा विचार करत नसल्यामुळे तो चांगली कामगिरी करतो.

गावसकर म्हणाले, 'या मोसमात कोहली 2016 च्या सीझन प्रमाणे पाहायला मिळेल. ज्यामध्ये त्याने आयपीएल सीझनमध्ये जवळपास 1000 धावा केल्या होत्या. त्यानंतर कोहलीने कर्णधारपद स्वीकारले होते.