मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) दुसरा सामना हा मुंबई इंडियन्स (Mumbai India) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यातून मुंबईकडून इलेक्ट्रेशनच्या मुलाने पदार्पण केलंय. तिलक वर्माने (Tilak Varma) मुंबईच्या 'पलटण' कडून आयपीएल डेब्यू केलंय. तिलक वर्माने पदार्पणातील सामन्यात 15 चेंडूत 22 धावांची शानदार खेळी केली. यामध्ये त्याने 3 चौकार लगावले. (ipl 2022 dc vs mi youngstar tilak verma makes debut for mumbai indians against delhi capitals at brabourne stadium mumbai)
तिलकची बेस प्राईज ही 20 लाख रुपये इतकी होती. मात्र मुंबईने तिलकसाठी तब्बल 1 कोटी 70 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. तिलकचा इथपर्यंतचा प्रवास हा फार खडतर आणि संघर्षपूर्ण असा होता.
तिलकचे वडील नंबुरी नागराजू हे हे इलेक्ट्रीशन आहेत. घरची हलाखीची स्थिती असल्याने नंबुरी यांना तिलकचा क्रिकेटसाठी होणारा खर्च परवडणारा नव्हता. त्यामुळे तिलकच्या क्रिकेटचा खर्च हा त्याचे कोच सलाम बयाश यांनी केला. तिलकला क्रिकेटसाठी काय हवंय आणि काय नको, याकडे जातीने लक्ष दिलं. टीम इंडियाने नुकताच अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला. तिलक या वर्ल्ड कप विनिंग टीमचा सदस्य होता.
तिलकची कामगिरी
तिलकने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या 2021-22 च्या हंगामात 149 च्या स्ट्राईक रेटने 215 धावा केल्या होत्या. तसेच त्याने विजय हजारे ट्रॉफीतही शानदार कामगिरी केली होती. या स्पर्धेत त्याने एक शतकही ठोकलं होतं.
तिलकने आतापर्यंत एकूण 15 टी 20 सामन्यात 143 च्या स्ट्राईक रेटने 381 धावा केल्या आहेत. त्यामुळे तिलक आता आयपीएलमध्ये कशी कामगिरी कामगिरी करतो, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.
मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंह, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स आणि बासिल थम्पी.
दिल्ली प्लेइंग इलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर), पृथ्वी शॉ, टीम सायफर्ट, मंदीप सिंह, रोवमैन पावेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, खलील अहमद, कुलदीप यादव आणि कमलेश नागरकोटी.