IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्सचा सलग चौथा पराभव आणि नको तेच झालं

चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सुरुवात वाईट स्वप्नासारखी झाली आहे.   

Updated: Apr 9, 2022, 09:55 PM IST
IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्सचा सलग चौथा पराभव आणि नको तेच झालं title=

नवी मुंबई : चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सुरुवात वाईट स्वप्नासारखी झाली आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमात आज (9 एप्रिल) डबल हेडर सामन्याचं आयोजन करण्यात आलंय. या डबल हेडरमधील पहिला सामना चेन्नई विरुद्ध हैदराबाद ( csk vs srh)  यांच्यात खेळवण्यात आला. हैदराबादने या सामन्यात 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईचा सलग चौथा पराभव ठरला. यासह चेन्नईच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. (ipl 2022 csk vs srh chennai super kings lost consecutive 4 matches after 2010)

चेन्नईची आयपीएलमध्ये सलग चार सामन्यात पराभूत होण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. याआधी चेन्नईचा 2010 मध्ये सलग 4 वेळा पराभव झाला होता. तेव्हा महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वात चेन्नईला हा पराभव स्वीकारावा लागला होता. तर यावेळेस रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja) कॅपटन्सीत चेन्नईवर ही वेळ ओढावली. रवींद्र जाडेजा नकारात्मक पद्धतीने धोनीच्या पावलावर पाऊल ठेवतोय.  

चेन्नईला या मोसमात आतापर्यंत या मोसमात कोलकाता, लखनऊ, पंजाब किंग्स आणि हैदराबादकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. 

सामन्याचा धावता आढावा

हैदराबादने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडले. चेन्नईने हैदराबादला विजयासाठी 155 धावांचे आव्हान दिले. हैदराबादने  हे विजयी आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात 17.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.