IPL 2022 | Virat Kohli चा पहिल्याच सामन्यात धमाका, मोठा रेकॉर्ड ब्रेक

विराट कोहलीने (Virat Kohli) पंजाब किंग्स (PBKS) विरुद्धच्या सामन्यात शानदार 41 धावांची खेळी केील.   

Updated: Mar 28, 2022, 03:49 PM IST
IPL 2022 | Virat Kohli चा पहिल्याच सामन्यात धमाका, मोठा रेकॉर्ड ब्रेक  title=
छाया सौजन्य : आयपीएल

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (RCB) आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) अपेक्षित  सुरुवात करण्यात अपयश आलं. मात्र संपूर्ण टीमने शानदार कामगिरी केली. कॅप्टन फॅफ डु प्लेसिस (Faf Du Plesis) आणि माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) दमदार बॅटिंग केली.  फॅफने 88 धावांची वादळी खेळी केली. तर विराटने 41 रन्स केल्या. यासह विराटने मोठा रेकॉर्ड ब्रेक केला. विराटने डेव्हिड वॉर्नरला (David Warner) पछाडलं. (ipl 2022 3rd match pbks vs rcb former captain virat kohli surpassed to david warner t20 runs record)

रविवारी (27 मार्च) डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात पंजाबने बंगळुरुवर विजय मिळवला. कॅप्टन फॅफची अर्धशतकी खेळी आणि कोहलीच्या बहरदार बॅटिंगच्या जोरावर बंगळुरुने 200 पार मजल मारली.

विराटने वॉर्नरला पछाडलं

विराटने 41 धावांच्या जोरावर वॉर्नरला मागे टाकलं. वॉर्नरने टी 20 क्रिकेटमध्ये 10 हजार 308 धावा केल्या आहेत. विराटने आतापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये एकूण 327 टी 20 सामन्यांमध्ये 10 हजार 314 रन्स केल्यात. यामध्ये त्याने 5 शतकं झळकावले आहेत. विशेष म्हणजे विराटने ही 5 शतकं आयपीएलमध्येच लगावली आहेत.

सर्वाधिक धावा कोणाच्या?

टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड हा वेस्टइंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने 463 टी 20 सामन्यात 22 शतकांसह 14 हजार 562 धावा केल्या आहेत. 

तर यादीत दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज शोएब मलिक आहे. शोएबने 11 हजार 698 रन्स केल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानी विंडिजचा किरॉन पोलार्ड आहे. पोलार्डने 11 हजार 430 धावा केल्या आहेत.