मुंबई : 'चायनामॅन बॉलर' कुलदीप यादवने (Chinaman Bolwer kuldeep Yadav) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) दुसऱ्या सामन्यात शानदार कामगिरी केली. कुलदीपने दिल्ली कॅपिट्ल्सकडून (Delhi Capitals) खेळताना मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) 3 विकेट्स घेतल्या. यासह कुलदीपने आयपीएलमध्ये दमदार पुनरामन केलं. (ipl 2022 2nd match dc vs mi delhi capitals chinaman bowler kuldeep yadav takes 3 wickets against mumbai indians)
कुलदीपने मुंबईच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. कुलदीपने 4 ओव्हरमध्ये 4.50 च्या इकॉनॉमी रेटने 18 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. कुलदीपने कॅप्टन रोहित शर्मा, आक्रमक किरॉन पोलार्ड आणि अनमोलप्रीत सिंह अशा 3 प्रमुख फलंदाजांना आऊट केलं.
कुलदीपची आयपीएलमध्ये 2 वर्षांनंतर एन्ट्री
कुलदीप टीम इंडियामधून बाहेर आहे. त्याची निवड तर होते मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळत नाही. तसेच कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या 14 व्या मोसमानंतर कुलदीपला रिलीज केलं.
मात्र त्यानंतर मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली फ्रँचायजीने कुलदीपवर विश्वास दाखवला. दिल्लीने कुलदीपसाठी 2 कोटी मोजले. त्यानंतर दिल्लीने आजच्या मुंबई विरुद्धच्या आपल्या सलामीच्या सामन्यात कुलदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी दिली.
या संधीमुळे कुलदीपचं तब्बल 2 वर्षांनंतर आयपीएलमध्ये कमबॅक झालं. कुलदीपने अखेरचा आयपीएलमधील सामना कोलकाताकडून बंगळुरु विरुद्ध खेळला होता.
दिल्लीला विजयसाठी 178 धावांचे आव्हान
दरम्यान मुंबईने दिल्लीला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले आहे. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 177 धावा केल्या. मुंबईकडून ओपनर ईशान किशनने सर्वाधिक नाबाद 81 धावांची खेळी केली. कॅप्टन रोहित शर्माने 41 धावा केल्या. तर पदार्पणवीर तिलक वर्माने 22 धावांचं योगदान दिलं.