IPL 2022 | कॅप्टन्सी सोडताच Mahednra Singh Dhoni चा धमाका, पहिल्याच सामन्यात शानदार फिफ्टी

कॅप्टन्सीच्या (Captaincy) जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) सलामीच्या सामन्यात धमाका केलाय.

Updated: Mar 26, 2022, 09:56 PM IST
IPL 2022 | कॅप्टन्सी सोडताच Mahednra Singh Dhoni चा धमाका, पहिल्याच सामन्यात शानदार फिफ्टी title=
छाया सौजन्य : सीएसके ट्विटर

मुंबई : कॅप्टन्सीच्या (Captaincy) जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) सलामीच्या सामन्यात धमाका केलाय. आयपीएलच्या 15 व्या सामन्यात (IPL 2022) चेन्नईकडून (CSK) खेळताना धोनीने (Mahi) कोलकाता विरुद्ध शानदार अर्धशतक ठरलं. मोसमातील पहिल्याच सामन्यात तडाखेदार खेळी केल्याने धोनीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. (ipl 2022 1st match csk vs kkr chennai super kings mahendra singh dhoni smashes fifty against at kolkata knight riders at wankhede stadium mumbai)
 
धोनीची शानदार फिफ्टी

धोनीने 38 चेंडूत नाबाद  50 धावांची खेळी केली. यामध्ये धोनीने 7 फोर आणि 1 सिक्स खेचला. धोनीच्या टी 20 कारकिर्दीतील हे 24 वं अर्धशतक ठरलं. धोनीने आयपीएलमध्ये तब्बल 3 वर्षांनंतर हे अर्धशतक लगावलं. धोनीने अखेरचं अर्धशतक हे 21एप्रिल 2019 ला बंगळुरु विरुद्ध केलं होतं. त्या वेळेस धोनीने  नाबाद 84 धावांची खेळी केली होती. 

सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

चेन्नईला शिवम दुबेच्या रुपात 5 वा धक्का बसला. त्यामुळे चेन्नईची 5 बाद 61 अशी स्थिती झाली. मात्र यानंतर जाडेजा आणि धोनी या दोघांनी चेन्नईचा डाव सावरला.  या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद  70 धावांची शानदार भागीदारी केली. 

धोनी व्यतिरिक्त चेन्नईकडून रॉबिन उथप्पाने 28 तर कॅप्टन जाडेजाने 26 धावांची नाबाद खेळी केली.  धोनीनी केलेली फटकेबाजी आणि उथप्पा आणि जाडेजाच्या खेळीच्या जोरावर  चेन्नईला कोलकाताला 20 ओव्हरमध्ये 131 धावांपर्यंत मजल मारता आली. कोलकाताकडून उमेश यादवने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर वरुण चक्रवर्थी आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.                       

कोलकाता नाईट रायडर्सचे अंतिम 11 खेळाडू - श्रेयस अय्यर (कर्णधार), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नीतीश राणा, सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन, सुनील नरेन, शिवम मावी, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.

सीएसकेची प्लेइंग इलेव्हन - रवींद्र जाडेजा (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, डेवन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, एमएस धोनी, शिवम दुबे, ड्वेन ब्रावो, तुषार देशपांडे, मिचेल सँटनर आणि एडम मिल्न.