मुंबई: राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळाला. शेवचट्या टप्प्यात राजस्थाननं बाजी पलटत सामना जिंकला. या सामन्या दरम्यान राजस्थानची फलंदाजी सुरू असताना ऋषभ पंतने फील्डिंग करताना घेतलेल्या कॅचचा फोटो व्हायरल होत आहे. इतकच नाही तर ऋषभ पंत आपल्या गोलंदाजांना कशा पद्धतीनं प्रोत्साहन देतो आणि मार्गदर्शन करतो हे दाखवणारा फोटो देखील सोशल मीडियावर समोर आला आहे.
सोशल मीडियावर पंतने फील्डिंग दरम्यान घेतलेल्या कॅचची चर्चा होत आहे. हा कॅच पाहून एक क्षण विराट कोहली, संजू सॅमसनची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. विराट कोहलीनं याआधी हवेत उडी मारून कॅच घेतला होता. त्यानंतर IPLमध्ये संजू सॅमसननं असा कॅच घेतला होता. आता पंतने घेतलेला जबरदस्त कॅच पाहून हैराण व्हाल. याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
MS Dhoni & Rishabh Pant guiding bowlers. We have seen it before! #RRvsDC pic.twitter.com/DjVjE1B8Z8
— UrMiL07(@urmilpatel30) April 15, 2021
Indian Wicketkeepers having a terrific night with gloves on. First Sanju Samson, now Rishabh Pant. pic.twitter.com/5KIKEsoTCs
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 15, 2021
Flying King @imVkohli #Kohli #INDvsENG #catch pic.twitter.com/wBMZHSeM7k
— Himangshu Mahata (@himangshu_himan) March 28, 2021
आधी संजू सॅमसननंतर हवेत झेप घेऊन कॅच घेतला होता. त्यानंतर ऋषभ पंतने देखील असाच कॅच पकडला होता. दुसरा फोटो आहे तो म्हणजे गुरू अर्थात महेंद्र सिंह धोनी आपल्या संघातील गोलंदाजांना ज्या पद्धतीनं गाइड करतात अगदी तशाच पद्धतीनं पंत गोलंदाजांना प्रोत्साहन देत असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे.
क्रिस वोक्सने आपल्या गोलंदाजीनं कमाल करत मनन वोहराला तंबुत धाडलं. त्यानंतर जोस बटलरला कॅच आऊट करण्यात पंत यशस्वी झाला. त्यामुळे राजस्थान संघाला मोठा धक्का बसला तर पंतच्या कॅचची चर्चा सर्वत्र होत आहे.