मुंबई: 9 एप्रिलपासून 6 शहरांमध्ये IPLसाठी सुरुवात होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघानं यावेळी विशेष तयारी केली आहे. केवळ शारीरिक बळच नाही तर मानसिक स्वास्थही उत्तम ठेवण्याकडे RCBच्या टीमने लक्ष दिलं आहे. खेळाडूंचं मनोबल खचणार नाही त्यांना सकारात्मकता मिळवून देण्यासाठी संघाचा खटाटोप सुरू आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बायो बबलमध्ये राहणं आणि एकूण सध्याच्या परिस्थितीचा विचार करता खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी कर्णधार विराट कोहलीचे आणि RCBच्य़ा मॅनेजमेंट टीमचे प्रयत्न सुरू आहेत.
अमर उजालानं दिलेल्या वृत्तानुसार संजना किरण RCBच्या टीमसोबत काम करणार आहेत. खेळाडूंचं मनोबल वाढवण्य़ासाठी आणि त्यांचं मनसिक स्वास्थ अधिक उत्तम ठेवण्यासाठी त्या RCB संघासोबत असणार आहेत. त्यांच्यासाठी हे काम आव्हानात्मक असणार आहे. याचं कारण म्हणजे खेळाडूंना अशा प्रकारचं प्रशिक्षण देणं हे आव्हान असल्याचं संजना यांनी सांगितलं.
क्रिकेटपटू कोणत्याही कारणास्तव दबावाखाली येणार नाही. त्याचा परिणाम थेट खेळावर होऊ शकतो. यासाठी सध्या काम करायचं आहे. त्यामुळे यावेळी IPLमध्ये RCB संघ केवळ आपल्या संघासाठी शारीरिक नाही तर मानसिक स्वास्थ देखील तितकच उत्तम राहण्यासाठी प्रयत्नशील आहे.
कर्णधार विराट कोहलीचा संघ IPLमध्ये उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. 9 एप्रिल ते 30 मे IPLचे सामने होणार आहेत. यावेळी RCB संघ IPLच्या ट्रॉफीपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
RCB संघात कोणकोण?
विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, एडम झंपा, शाहबाज अहमद, जोश फिलिप, क्रिश रिचर्डसन, पवन देशपांडे, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद आजम जेमीसन, डॅन ख्रिश्चन