IPL 2021: कॅच घेताच या खेळाडूनं राहुल तेवतियासोबत घेतला सेल्फी, व्हिडीओ

अरे देवा! आधी कानाला शूट लावून फोन आता फोनशिवाय सेल्फी, खेळाडूंची मैदानात धमाल, पाहा व्हिडीओ

Updated: Apr 25, 2021, 11:19 AM IST
IPL 2021: कॅच घेताच या खेळाडूनं राहुल तेवतियासोबत घेतला सेल्फी, व्हिडीओ title=

मुंबई: राजस्थान रॉयल्स संघातील गोलंदाजांसमोर कोलकाता संघाला नाकीनऊ आले आणि राजस्थान संघाने अखेर 6 विकेट्सनं KKRवर विजय मिळवला आहे. यंदाच्या हंगामातील हा राजस्थानचा दुसरा विजय आहे. डेव्हिड मिलर-संजू सॅमसन या जोडीनं चांगली फलंदाजी केली तर गोलंदाजीमध्ये मॉरिस कोलकातासाठी घातक ठरला.

दरम्यान फील्डिंग करताना आऊट झाल्यानंतर बिहू डान्स करणाऱ्या रियान परागनं यावेळी डान्स केलाच नाही. तर एक मजेशीर प्रकार केला ज्यामुळे त्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. 

कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजीदरम्यान कोलकाताचा फलंदाज राहुल त्रिपाठीने 18 व्या ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज मुस्तफिजुर रहमानच्या गोलंदाजीवर एअरशॉट मारला. 19 वर्षीय राजस्थान रॉयल्सचा खेळाडू रियान परागने फील्डिंगदरम्यान तो कॅच पकडला. 

या कॅच आऊटचं सेलिब्रेशन नेहमीप्रमाणे बिहू डान्सकरून नाही तर राहुल तेवतियासोबत मैदानात एक सेल्फी घेऊन केलं आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओमध्ये पाहू शकता रियानच्या हातात मोबाईल नाही तरी तो खिशातून मोबाईल काढल्याची अ‍ॅक्शन करत कॅच घेतलेल्या बॉलनेच सेल्फी घेतला आहे. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

नुकताच झिम्बाब्वेच्या बॉलरचा एक व्हिडीओ चर्चेत होता. त्याने आऊट झाल्याचं सेलिब्रेशन आणि आनंद व्यक्त करत शूज कानाला लावत फोन केल्याची नक्कल केली. त्याच्या या व्हिडीओची चर्चा होत असतानाच आता सोशल मीडियावर रियान पराग देखील पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

राजस्थान संघानं यंदाच्या मौसमातील दुसरा विजय मिळवला आहे. ख्रिस मॉरिसनं कमालीची गोलंदाजी केली. त्याने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात 4 विकेट्सही घेतल्या. कोलकाता संघाला राजस्थाननं 6 विकेट्सने पराभूत केलं आहे.