यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 39 वा सामना (IPL 2021 Match 39) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात खेळवण्यात येत आहे. दोन्ही टीमने या दुसऱ्या टप्प्यातील पहिले 2 सामने गमावले आहेत. त्यामुळे प्लेऑफच्या (Playoffs2021) दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्यात संघर्ष पाहायला मिळतोय. मुंबईने टॉस जिंकून बंगळुरुला बॅटिंगसाठी भाग पाडलं. त्यामुळे साहजिकपणे मुंबईला आधी गोलंदाजी करावी लागली. (ipl 2021 Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians spinner rahul chahar angry celebration after k s bharat out on his bowling)
मुंबईचा फिरकी गोलंदाज राहुल चाहर (Rahul Chahr) बोलिंग दरम्यान आक्रमक झालेला दिसून आला. राहुलने बंगळुरुच्या केएस भरतला (K S Bharat) आऊट केलं. आऊट केल्यानंतर प्रत्येक गोलंदाज जल्लोष करतो. पण राहुलने केलेला जल्लोष क्रिकेट चाहत्यांना काही पटलं नाही. राहुलने केएसला आऊट केल्याचं सेलिब्रेशन केलं. मात्र या दरम्यान त्याने अपशब्द वापरल्याचं म्हंटलं जात आहे.
राहुलने नक्की शिव्या दिल्या की नाही, हे रेकॉर्ड तर झालं नाही. पण त्याच्या ओठांच्या हालचालींवरुन तरी त्याने अपशब्द वापरले असल्याचं चाहत्यांचं म्हणंन आहे. यावेळेस बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली भरतसोबत बॅटिंग करत होता.
विराटही मैदानात नेहमी आक्रमक असतो. मात्र आज राहुलचा आक्रमकपणा पाहून विराटही शांतच झाला. राहुलने केलेलं हे सेलिब्रेशन विराट पाहतच राहिला. तर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माही काहीही बोलला नाही.
राहुल नक्की का तापला?
हा सर्व प्रकार बंगळुरुच्या बॅटिंगच्या 9 वव्या ओव्हरदरम्यान घडला. राहुल चाहर बोलिंग टाकत होता. पहिल्या चेंडूवर हार्दिक पंड्याने विराट कोहलीचा कॅच सोडला. त्यामुळे राहुल नाराज झाला. यानंतर केएस भरतने शानदार सिक्स लगावला. केएसने हा सिक्स डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला मारला. खणखणीत सिक्स मारल्याने केएस मैदानात जल्लोष करु लागला. केएसचं हे सेलिब्रेशन राहुलच्या जिव्हारी लागलं.
मात्र राहुलने पुढच्याच चेंडूवर केएसला आऊट केलं. केएसने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपूर्ण ठरला. तिथे सूर्यकुमार यादव उभा होता. त्याने कोणतीही चूक न करता कॅच पकडला. केएसला आऊट केल्यानं राहुलला आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र यादरम्यान स्वत:वरचं नियंत्रण गमावलं. राहुल केएसकडे रागाने पाहत बडबडत होता. यानंतर त्याने विकेटकीपर क्वींटन डी कॉकच्या हातावर जोरात हात मारला.
राहुलने अपशब्द वापरले की नाही माहिती नाही, पण त्याने मैदानात जे काही केलं ते मात्र क्रिकेट चाहत्यांना पटलं नाही. दरम्यान केएस भरतने 24 चेंडूत 2 चौकार आणि 2 सिक्ससह 32 धावांची खेळी केली.
मुंबईला विजयासाठी 166 धावांची आवश्यकता
दरम्यान बंगळुरुने मुंबईला विजयासाठी 166 धावांचे आव्हान दिले आहे. बंगळुरुने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 165 धावा केल्या. बंगळुरुकडून ग्लेन मॅक्सवेलने 37 चेंडूत 6 चौकार आणि 3 सिक्ससह 56 धावांची खेळी केली.
तर याखालोखाल कर्णधार विराट कोहलीने 51 रन्सची खेळी केली. तर केएसनेही 32 रन्स केल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराह 3 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट, एडम मिलने आणि राहुल चाहरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
Chumtiya Rahul Chahar
pic.twitter.com/gzTbN5elcq— A N K I T (@Ankitaker) September 26, 2021