मुंबई : यापूर्वीही अनेक खेळाडूंनी आयपीएलमधील कामगिरीच्या माध्यमातून टीम इंडियामध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. गेल्या वर्षी आयपीएलच्या13व्या सत्रातच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट टीमला एकापेक्षा एक सर्वोत्कृष्ट खेळाडू मिळाले आहेत. याचा परिणाम गेल्या 4 महिन्यांतच दिसून आला आहे. जेव्हा अनेक नवीन चेहर्यांनी टीम इंडियामध्ये आपले स्थान निर्माण केले आणि आपल्या खेळाचे चांगले प्रदर्शन देखील केले आहे. परंतु टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंची केवळ कामगिरीच नव्हे तर, फिटनेस देखील आवश्यक आहे.
याचे एक उदाहरण राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू राहुल तेवतिया (Rahul Tewatia) आहे. ज्याने नुकतेच फिटनेसमुळे टीम इंडियामध्ये सिलेक्ट होण्याची संधी गमावली. पण आयपीएल व्यासपीठावरच आश्चर्यकारक कामगिरी करुन राहुल तेवतियाने पुन्हा स्वत:ला सिद्ध करुन सगळ्यांना उत्तर दिलं आहे.
युएईमध्ये मागील सीझनमध्ये सरप्राईज सुपरस्टार म्हणून ओऴखल्या जाणाऱ्या राहुल तेवतियाची यावर्षी इंग्लंडविरूद्ध झालेल्या टी -२० सीरिज खेळ्यासाठी भारतीय संघात निवड झाली होती. परंतु तेव्हा फिटनेसमुळे त्याच्या हाती निराशा लागली. संघात प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या यो-यो टेस्टमध्ये तो पास होऊ शकला नाही. ज्यामुळे निळी जर्सी घालण्याची त्याने मोठी संधी गमावली.
आता अशा परिस्थितीत आता राहुल तेवतियाला (Rahul Tewatia) आयपीएलमधून (IPL 2021) आपली फिटनेस व क्षमता सिद्ध करण्यासाठी चांगली संधी मिळाली आहे. तेवतियाने आपल्या पहिल्याच सामन्यापासून खेळ दाखवण्यास सुरुवात केली आहे. या सामन्यात तो गोलंदाजी किंवा फलंदाजीमध्ये फारसा काहीकरू शकला नाही, परंतु फिल्डींगमध्ये त्याने आपली अप्रतिम कामगिरी दाखविली.
तेवतियाने (Rahul Tewatia) पकडलेल्या कॅचमुळे त्याने फक्त केएल राहुललाचा (K L Rahul) शतक रोखला नाही, तर त्यांची फिटनेस देखील चांगली होत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. आता संधी मिळाल्यास तो पुन्हा टीम इंडियामध्ये स्थान मिळवू शकतो.