मुंबई : आयपीएल 2021 (IPL 2021) काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे प्रत्येक टीमने तयारी सुरु केली आहे. 5 वेळा चॅम्पियन ठरलेली मुंबई इंडियंस (Mumbai Indians) या सीजनमध्ये नव्या रुपात दिसणार आहे. यासाठी फ्रेंचायजीने जर्सीमध्ये बदल केले आहे.
मुंबई इंडियन्सची नवी जर्सी
आयपीएल 2021 साठी मुंबई इंडियन्सने आपली नवी जर्सी लॉन्च केली आहे. याबाबत फ्रेंचायजीने म्हटलं की, 'नवी जर्सीमध्ये 5 मूळ तत्व, त्वों पृथ्वी, जल, अग्नी, वायु आणि आकाश यांचा समावेश आहे. जे आमचे मूळ मूल्य आणि विचारधारेवर आधारित आहे. आमचे 5 आयपीएल खिताब या मुल्यांसाठी आमची असलेली प्रतिबद्धता दर्शवते.' त्यामुळे रोहित शर्मा (Rohit sharma) आणि टीम नव्या लूकमध्ये दिसणार आहे.
season, look
Pre-order your MI Blue and Gold jersey here: https://t.co/Oo7qj5m4cN#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 @Jaspritbumrah93 @ImRo45 @hardikpandya7 @thesouledstore pic.twitter.com/02tgcvXuFK
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2021
ब्लू जर्सीमध्ये गोल्डन टच
मुंबई इंडियन्सने म्हटलं की, आधीच्या निळ्या रंग्याच्या जर्सीमध्ये सोनेरी रंगाचा अधिक वापर आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 9 एप्रिलला आरसीबीच्या विरुद्ध होणार आहे. मुंबईने 2011, 2013, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएलचा खिताब जिंकला आहे.
Love at first sight!
Can't wait to see the boys wear the all-new MI jersey in #IPL2021
Pre-order yours https://t.co/Oo7qj5m4cN#OneFamily #MumbaiIndians pic.twitter.com/mdGw4ZEai3
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2021