मुंबई: IPL हा सर्वांचा आवडता खेळ. अगदी खेळापासून ते आर्थिक गणितापर्यंत मोठ्या उलाढाली या खेळातात होत असतात. 2008 ला सुरू झालेला या IPLलीगला यंदा 14 वर्ष पूर्ण झाली. जगातील सर्वात मोठी लीग असा याचा उल्लेख केला जातो. जगभरातील स्टार खेळाडू या लीगमध्ये एकत्र खेळतानाही दिसतात. या सामन्यांमधून BCCIला दरवर्षी मोठा फायदा देखील होत असतो. जवळपास 5000 कोटींच्या आसपास हा फायदा होतो असंही म्हणायला हरकत नाही.
आता महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली असो किंवा परदेशी डेव्हिड वॉर्नर पासून ते गेलपर्यंत अनेक खेळाडूंना सध्या किती सॅलरी मिळते हे माहिती असेल पण जेव्हा सुरुवातीच्या काळात म्हणजेच 2008च्या दरम्यान त्यांना पहिली सॅलरी किती मिळाली होती हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वानाच आहे. यंदाच्या हंगामातील खेळाची चुरस तर वाढली आहे त्यानिमित्तानं जाणून घेऊया की या प्रसिद्ध खेळाडूंची पहिली सॅलरी किती होती?
महेंद्रसिंह धोनी (माही, थाला)
महेंद्र सिंह धोनी IPLमधील असा एकमेव क्रिकेटपटू आणि कर्णधार आहे जो सुरुवातीपासून चेन्नईचं नेतृत्व करत आहे. पहिल्या हंगामापासून ते आजापर्यंत चेन्नईचं नेतृत्व धोनीच्या खांद्यावर आहे. 2008 मध्ये खेळवण्यात आलेल्या IPLच्या पहिल्याच हंगामात चेन्नईच्या फ्रांचायझीने त्याला 6 कोटी रुपये देऊन संघात समाविष्ट करून घेतलं होतं. सध्या धोनीला 15 कोटी रुपये सॅलरी घेत आहे.
विराट कोहली (किंग कोहली, चिकू)
IPLच्या इतिहासातील एकमेव खेळाडू आहे जो IPLच्या सुरुवातीपासून RCB संघातून खेळत आहे. 2008मध्ये RCB संघाने 12 लाख रुपये देऊन त्याला RCB मध्ये समाविष्ट करून घेतलं होतं. आताच्या घडीला तो 17 कोटी रुपये सॅलरी घेत आहे.
रोहित शर्मा (हिटमॅन)
हिटमॅन रोहित शर्मा सुरुवातील डेक्कन चार्जर्स हैदराबाद संघाकडून खेळला होता. 2009 च्या दुसऱ्या हंगामात त्याला 3 कोटी रुपये देऊन फ्रांचायझीने समाविष्ट करून घेतलं होतं. 2011 मध्ये मुंबई इंडियन्स संघात घेण्यात आलं. आज हिटमॅन रोहित 15 कोटी रुपये खेळण्याचे घेत आहे.
जसप्रीत बुमराह (जेबी, जस्सी, बुमराह)
सर्वात खतरनाक बॉलर म्हणून बुमराहकडे पाहिलं जातं. धावा तर देतच नाही पण विकेट्सही घेतल्याशिवाय राहात नाही. बुमराह कधी कर्णधाराला नाराज करत नाही अशी त्याची ख्याती आहे. 2013मध्ये मुंबई इंडियन्स संघाने 10 लाख रुपये देऊन आपल्या संघात समाविष्ट करून घेतलं. आजच्या घडीला बुमराह 7 कोटी रुपये घेतो.
सुरेश रैना (सोनू)
IPLच्या इतिहासात सर्वात जास्त धावा बनवणारा विराट कोहलीनंतरचा खेळाडू कोण असले तर रैनाचं नाव घेतलं जातं. 2008मध्य़े रैनाला 26 लाख रुपये देऊन चेन्नईने संघात घेतलं होतं. आज जवळपास 11 कोटी रुपये तो सॅलरी घेत आहे.
के. एल राहुल
RCB संघाने 10 लाख रुपये देऊन 2013मध्ये संघात समाविष्ट करून घेतलं होतं. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाकडून 2 सीझन त्याने खेळले. आता तो पंजाब संघाकडून खेळत आहे. आताच्या घडीला तो 11 कोटी रुपये घेत आहे.
हार्दिक पांड्या (रॉकस्टार)
मुंबई इंडियन्सच्या सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये पांड्याचं नाव घेतलं जातं. 2015मध्ये त्याला 10 लाख रुपये देऊन MI संघात घेण्यात आलं. आजच्या घडीला मुंबई इंडियन्स संघात तो 11 कोटी रुपये घेतो.
ख्रिस गेल (गेलफोर्स, गेलस्ट्रोम)
IPLमध्ये मैदानात वादळ आणणारा खेळाडू म्हणजे ख्रिस गेल. 2008 साली त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने 3.2 कोटी रुपये देऊन KKRमध्ये समाविष्ट केलं. त्यानंतर बंगळुरू संघाकडून देखील तो खेळला आहे. सध्या पंजाब संघातून तो खेळत आहे.
किरोन पोलार्ड (पोलार्ड)
मुंबई इंडियन्स संघाने 2010मध्ये त्याला 3.4 कोटी रुपये देऊन संघात घेतलं होतं. सध्या तो 5.4 कोटी रुपये घेतो. आजही पोलार्ड मुंबई संघाकडून खेळत आहे.
एबी डिविलियर्स (मिस्टर 360 डिग्री)
IPLच्या इतिहासात ए बी डिव्हिलियर्सचा पहिल्या 5 क्रमांकांमध्ये नंबर येतो. 360 डिग्री शॉट खेळणाऱ्या या खेळाडूला क्रिकेटचा सुपरमॅन असंही म्हटलं जातं. 2008 मध्ये सर्वात पहिल्यांदा दिल्ली कॅपिटल्स संघाने 1.2 कोटी रुपये देऊन त्याला संघात समाविष्ट केलं होतं. सध्या तो बंगळुरू संघातून खेळत आहे.
डेव्हिड वॉर्नर
2009 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने 14 कोटी रुपये देऊन संघात समाविष्ट करून घेतलं होतं. सध्या सनरायझर्स हैदराबाद संघात वॉर्नर आहे. 12.5 सॅलरी तो घेत आहे.