IPL 2021: "धोनी माझ्यासाठी प्रत्येक समस्येवर उपचार" असे ऋषभ पंत, CSK ला वाईट पद्धतीने हरवल्यानंतर का म्हणाला?

पहिल्यांदाच कॅप्टन म्हणून मैदानात उतरलेल्या पंतने चेन्नई विरुद्ध सामना जिंकला. त्यानंतर त्याने महेद्रसिंग धोनी हा माझ्यासाठी प्रत्येक आजारावर उपचार असल्याचे सांगितले.

Updated: Apr 11, 2021, 03:53 PM IST
IPL 2021: "धोनी माझ्यासाठी प्रत्येक समस्येवर उपचार" असे ऋषभ पंत, CSK ला वाईट पद्धतीने हरवल्यानंतर का म्हणाला? title=

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जचा 7 विकेट्सने पराभव केल्यानंतर दिल्ली कॅपिटलचा कर्णधार ऋषभ पंतने एमएस धोनीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. पहिल्यांदाच कॅप्टन म्हणून मैदानात उतरलेल्या पंतने चेन्नई विरुद्ध सामना जिंकला. त्यानंतर त्याने महेद्रसिंग धोनी हा माझ्यासाठी प्रत्येक आजारावर उपचार असल्याचे सांगितले.

आता जेव्हा एका संघाचा कर्णधार दुसर्‍या संघाच्या कर्णधाराविषयी असे म्हणतो, तेव्हा सगळ्यांना आश्चर्य तर वाटेलच आणि बरेच प्रश्न देखील मनात निर्माण होतील.

मुंबईच्या वानखडे मैदानावर चेन्नई सुपर किंग्स ने दिल्ली कॅपिटल्सचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. दिल्लीने हा सामना 8 बॉल्सने जिंकला आहे. चेन्नईने सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि दिल्ली समोर 189 धावांचे लक्ष्य ठेवले. हे लक्ष्य तसे मोठे होते, परंतु मुंबईच्या या मैदानात ते पूर्ण करणे सोपं होते. त्यामुळे पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या स्फोटक खेळामुळे दिल्लीने ते लक्ष सहज पूर्ण केले.

धोनी म्हणजे प्रत्येक आजारावर उपचार - पंत

आता ऋषभ पंतच्या त्या वक्तव्याचा बद्दल बोलायचं झालं जे त्याने धोनी बद्दल दिले आहे , त्यासाठी तुम्हाला ऋषभ पंतने केलेले संपूर्ण विधान समजने आवश्यक आहे. दिल्लीचा कर्णधार असलेल्या पंतने सामना संपल्यानंतर धोनीबद्दल वक्तव्य केले की, “आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात धोनी विरुद्ध कॅप्टनशीप करणे, त्याच्या सोबत टॅास करणे, ही माझ्यासाठी एक विलक्षण गोष्ट आहे. मी धोनीकडून बरेच काही शिकलो आहे. मला काहीही समस्या असल्यास मी थेट त्याच्याकडेच जातो. त्याच्याकडे माझ्या प्रत्येक समस्येवर उपचार असतात. मला वाटते ही चांगली गोष्ट आहे."

संघाच्या कामगिरीचे कौतुक आणि  गेमप्लॅन

अर्थात हे संपूर्ण विधान वाचल्यानंतर आणि समजल्यानंतर आता तुम्हालाही खात्री पटली असेल की, धोनी ऋषभ पंतसाठी कसा प्रत्येक आजारासाठी उपचार असू शकतो ते. ऋषभ पंतने सामन्यानंतर धोनीबद्दलच वक्तव्य केलं नाही तर, त्याने आपल्या संघाच्या कामगिरी बद्दलही वक्तव्य केले.

ऋषभ पंत आपल्या संघाच्या फलंदाजी आणि पुढच्या गेम प्लॅन बद्दल म्हणाला, "शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी चांगली फलंदाजी केली. त्यांनी आम्हाला चांगली सुरुवात करुन दिली." धवनने CSK विरुद्धच्या सामन्यात 85 धावा आणि पृथ्वीने 72 धावा केल्या आहेत.कर्णधार पंत पुढे म्हणाले की, "याक्षणी आम्ही रन रेटबद्दल जास्त विचार करत नव्हतो कारण आयपीएलमधील हा आमचा पहिलाच सामना आहे."