IPL 2021: सुरेश रैनामुळे वादात अडकले गौतम गंभीर आणि पार्थिव पटेल, हे आहे कारण

गौतम गंभीरला धोनीचा निर्णय समजला नाही. गौतम गंभीरने धोनीच्या या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

Updated: Apr 11, 2021, 03:45 PM IST
IPL 2021: सुरेश रैनामुळे वादात अडकले गौतम गंभीर आणि पार्थिव पटेल, हे आहे कारण title=

मुंबई : आयपीएल 2021 च्या दुसर्‍या सामन्यात दिल्ली कॅपिटल संघाने चेन्नई सुपर किंग्जचा 7 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारताचा माजी सलामीवीर बॅट्समॅन गौतम गंभीरने चेन्नई सुपर किंग्जच्या बॅटिंगच्या क्रमवारीवर प्रश्न उपस्थित केले. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने बॅटिंगसाठी सुरेश रैनाला तिसऱ्या क्रमांकाऐवजी चौथ्या क्रमांकावर उतरवले. गौतम गंभीरला धोनीचा हा निर्णय समजला नाही. गौतम गंभीरने धोनीच्या या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

रैना चौथ्या क्रमांकावर का आहे?

आयपीएलची कमेंट्री करताना गौतम गंभीर म्हणाला, "तुम्हाला माहिती आहे की, सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्जकडून गेली कित्येक वर्ष तिसर्‍या क्रमांकावर बॅटिंग करत आहे. परंतु यावेळेस त्याला बॅटिंगसाठी तिसऱ्या क्रमांकाऐवजी चौथ्या क्रमांकावर उतरवले गेले आहे."

गौतम गंभीर पुढे म्हणाला, "सुरेश रैनाच्या जागी मोईन अलीला तिसर्‍या क्रमांकावर पाठवण्या मागील धोनीचा काय विचार आहे? हे तर धोनीच सांगू शकेल." यानंतर गौतम गंभीरला मध्येच थांबवत भारतीय टीमचा माजी विकेटकीपर पार्थिव पटेलने आपले मत व्यक्त केले.

गंभीर आणि पार्थिव यांच्यात वादविवाद

पार्थिव पटेल म्हणाला, "मला वाटतंय सुरेश रैना बऱ्याच काळापासून खेळत नाही आहे. त्याचबरोबर मोईन अलीकडे भारताविरुद्ध टी -२० वनडे सीरीज खेळल्याचा अनुभव आहे. त्यामुळेच धोनी सुरेश रैनाच्या आधी मोईन अलीला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा विचार करत असावा."

पार्थिवच्या वक्तव्यावर गंभीरचा हल्ला

गौतम गंभीर आणि पार्थिव पटेल यांच्यातील ही चर्चा येथेच संपली नाही. यानंतर, गौतम गंभीरने पार्थिवच्या वक्तव्यावर जोरदार निशाणा साधला आणि म्हणाला, "पण तरीही दुसरी विकेट पडताच त्यांना सुरेश रैनाला पाठवावे लागेलच." हा वाद पुढे वाढणार इतक्यात आकाश चोप्रानेमध्ये पडत या दोघांमधील वाद शांत केला.

पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला

दिल्लीविरुद्धच्या आयपीएल सामन्यात चेन्नईची पहिली विकेट 7 धावांवर पडली, त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने सुरेश रैनाच्या जागी मोईन अलीला तिसर्‍या क्रमांकावर बॅटिंगसाठी पाठवले. त्यानंतर परत 7 धावांच्या स्कोरवरतीच चेन्नईची दुसरी विकेटही पडली. यानंतर सुरेश रैना चौथ्या क्रमांकावर बॅटिंगसा आला. त्यावेळी गौतम गंभीरने रैनाच्या बॅटिंग ऑर्डर विषयी भाष्य करत धोनीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.