मुंबई: हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने 13 धावांनी विजय मिळवला. यावेळी मुंबई इंडियन्स संघातील एका खेळाडूचा फील्डिंग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या खेळाडूला स्विमिंग करतानाची उपमा दिली आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजी दरम्यान पाचव्या ओव्हरमध्ये कृणाल पांड्याची गोलंदाजी सुरू होती. त्यावेळी डेव्हिड वॉर्नरने चौकार ठोकला. हा चौकार जाऊ नये यासाठी मुंबई संघातील ट्रेंट बोल्टने खूप प्रयत्न केले. त्याने स्विमिंग स्टाईलने हा बॉल रोखण्याचा प्रयत्न केला मात्र प्रयत्न अपयशी झाले. त्याच्या मजेशीर स्टाइलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
— Raj Nathwani (@rajnatuu) April 17, 2021
Trent Boult can swim without water #SRHvMI @trent_boult ( just a joke) pic.twitter.com/7NcyyW9E5Y
— Param Patel (@ParamPa87051521) April 17, 2021
Jesus: I can walk on water
Trent Boult: I can swim on land https://t.co/MS8ql0MHSq— Antariksh Dhanuka (@Adhanuka96) April 17, 2021
Trent Boult surfing while chasing the ball. pic.twitter.com/E8Y1NBcgbZ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 17, 2021
दरम्यान मैदानात बॉल पकडताना मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा तोल गेला आणि हा मजेशीर प्रकार घडला. बॉल पकडण्याच्या नादात ट्रेंट बोल्ट खाली कोसळला आणि चौकार गेला. त्याने बॉल सोडल्यानं कृणाल पांड्या देखील खूप नाराज होता. बोल्टचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोकांनी त्याला स्विमिंग स्टाइलची उपमा दिली आहे.
हैदराबाद संघ सलग तिसऱ्यांदा पराभूत झाला आहे. आधी कोलकाता त्यानंतर बंगळुरू आणि आता मुंबई संघानेही 13 धावांनी पराभव केल्यानं हैदराबादच्या पदरी फक्त निराशाच पडल्याचं पाहायला मिळालं.