IPL 2021: मुंबई की हैदराबाद? हे 4 खेळाडू ठरवणार आजच्या सामन्याचं भविष्य

साधारण हैदराबाद विरुद्ध मुंबई आतापर्यंत IPLमध्ये झालेल्या सामन्यांचा विचार करायाचा झाला तर दोन्ही संघ 16 सामने एकमेकांविरोधात खेळले आहेत. 

Updated: Apr 17, 2021, 05:18 PM IST
IPL 2021: मुंबई की हैदराबाद? हे 4 खेळाडू ठरवणार आजच्या सामन्याचं भविष्य title=

मुंबई: मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना चेपॉक स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. दोन सामने पराभूत झालेला हैदराबाद आज मुंबई विरुद्ध सामना खेळणार आहे. मुंबईला पराभूत करण्याचं आव्हानं संघासमोर असणार आहे. 

साधारण हैदराबाद विरुद्ध मुंबई आतापर्यंत IPLमध्ये झालेल्या सामन्यांचा विचार करायाचा झाला तर दोन्ही संघ 16 सामने एकमेकांविरोधात खेळले आहेत. त्यापैकी दोन्ही संघ 8-8 वेळा जिंकले आहेत. आजच्या सामन्यात 4 खेळाडू सामन्याचं भवितव्य ठरवू शकतात किंवा ऐनवेळी बाजी पलटवण्यात त्यांचा वाटा असेल. 

हैदराबादवर आज पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स भारी पडणार असं सध्या तरी दिसत आहे. मात्र हैदराबाद संघाकडे देखील भुवनेश्वर कुमार आणि डेव्हिड वॉर्नर सारखे तगडे खेळाडू आहेत. भुवनेश्वर कुमारनं आतापर्यंत MI विरुद्ध झालेल्या सामन्यात 16 विकेट्स घेतल्या आहेत. तर वॉर्नरनं 488 धावा काढल्या आहेत. 

मुंबई संघामध्ये कायरन पोलार्ड आणि बुमराह सारखे खेळाडू आहेत. पोलार्डने आतापर्यंतच्या मुंबई विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये 11 कॅच घेतल्या आहेत. त्यामुळे हैदराबाद संघासाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे आजचा सामना काँटे की टक्कर असणार आहे. 

मुंबई आणि हैदराबाद संघाच्या प्लेइंग इलेवनमध्ये कोण कोण असणार?

सनरायझर्स हैदराबाद संघ
ऋद्धिमान साहा, डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), मनीष पांडे, जॉनी बेअरस्टो / केन विल्यमसन, अब्दुल समद, केदार जाधव / विजय शंकर, जेसन होल्डर, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, शाहबाज नदीम, आणि टी नटराजन

मुंबई इंडियन्स संघ
क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, मार्को जेन्सन / नाथन कुलपर नाईल, राहुल चहर, ट्रेंट बाउल्ट आणि जसप्रीत बुमराह