मुंबई: अखेर प्रतीक्षा संपली आहे. आजपासून IPLच्या सामन्यांना सुरुवात होत आहे. 30 मे पर्यंत IPLचे सामने रंगणार आहेत. आज मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु असा सामना रंगणार आहे. विराट कोहलीच्या डोक्यावरच टेन्शन थोड कमी होतं म्हणता म्हणता आता संघातील सलामीवीर फलंदाज पहिला सामना खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा सलामीवीर फलंदाज देवदत्त पडिक्कल याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तो कोरोनावर यशस्वीपणे मात करून संघात परतला आहे. मात्र तो पहिला सामना खेळणार की नाही याबाबत अद्यापही शंका आहे.
तर इनसाइड स्पोर्ट्सनं दिलेल्या वृत्तानुसार देवदत्त पडिक्कल ओपनिंग फलंदाज नसेल. पहिला सामना तो खेळणार नाही असंही सांगितलं जात आहे. नुकताच कोरोनातून बरा झाल्यानं तो पहिला सामना खेळणार नसल्याच्या चर्चा आहेत. तर दुसरीकडे ओपनिंग फलंदाजीला कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातून आज पहिल्या सामन्यासाठी ओपनिंग पार्टनर म्हणून अजहरुद्दीन किंवा फिन एलन पैकी कोणाची तरी एकाची निवड करण्यात येणार आहे. रोहित शर्माचा संघ विरुद्ध विराट कोहलीचा संघ (MI vs RCB) संध्याकाळी 7.30 वाजता सामना होणार आहे.
नुकताच देवदत्तचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून तो संघासोबत जॉइन झाला आहे. मात्र आज होणारा IPLमधील पहिला सामना खेळणार की नाही याबाबत अजूनही प्रश्न कायम आहे. प्रत्यक्षात सामना सुरु होण्याआधी समजू शकेल.
संभाव्य प्लेइंग इलेवन
मोहम्मद अजहरुद्दीन / फिन एलन, विराट कोहली (कर्णधार), रजत पाटीदार, एबी डिविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, डॅन क्रिश्चियन, वाशिंगटन सुंदर, काइली जेमीसन, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी