IPL 2021 | मुंबईच्या सलग तिसऱ्या पराभवानंतर कोच संतापला, 'पलटण'ला इशारा

 विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) मुंबईचा (Mumbai Indians)  54 धावांने दणदणीत विजय मिळवला. मुंबईचा या मोसमातील दुसऱ्या टप्प्यातील सलग तिसरा पराभव ठरला.   

Updated: Sep 27, 2021, 10:57 PM IST
IPL 2021 | मुंबईच्या सलग तिसऱ्या पराभवानंतर कोच संतापला, 'पलटण'ला इशारा title=

यूएई : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) मुंबईचा (Mumbai Indians)  54 धावांने दणदणीत विजय मिळवला. मुंबईचा या मोसमातील दुसऱ्या टप्प्यातील सलग तिसरा पराभव ठरला. या पराभवामुळे मुंबईचं प्लेऑफमध्ये पोहचण्याचा मार्ग खडतर झाला आहे. मुंबई आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ आहे. मात्र मुंबईला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागल्याने मुंबईच्या कोचिंग टीमचा भाग असलेला झहीर खान (Zaheer Khan) चांगलाच संतापला आहे. त्याने खेळाडूंची चांगलीच कानऊघडणी केली आहे. (ipl 2021 mi vs rcb mumbai indians failed to low aggression says zaheer khan) 

झहीर काय म्हणाला?
 
"आपल्याकडे आता फार कमी वेळ राहिला आहे. आता या सर्वातून आपल्याला उभं राहायला हवं. आता पुन्हा एकदा कमबॅक करायला हवं.  आगामी सामन्यात कोणत्याही परिस्थिती विजय मिळवायला हवा. सर्वांनी सांघिक कामगिरी करुन सामना जिंकायला हवं. चांगली कामगिरी करायला हवी" असं झहीरने नमूद केलं. "तसेच आक्रमकता ही मुंबईची ओळख आहे. मात्र यावेळेस आतापर्यंत ती आक्रमकता खेळात दिसून आली नाही", असंही झहीरने म्हंटलं. 

सातत्याचा अभाव

"आपण सातत्याने चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतोय. आपण एका टप्प्यात चांगली कामगिरी करतोय. टी 20 वर्ल्ड कपसाठी राहुल चाहरची निवड करण्यात आली. मात्र चाहरलाही अपेक्षित कामगिरी करता येत नाहीये. परिस्थिती प्रतिकूल असल्यावर सहजपणे कमबॅक करता येत नाही. मात्र राहुल दमदार कमबॅक करेल", असा विश्वास झहीरने व्यक्त केला.