यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL 2021) आज (28 सप्टेंबर) डबल हेडर सामन्यांचं आयोजन केलं गेलंय. या डबल हेडरमधील पहिला सामना कोलकाता विरुद्ध दिल्ली यांच्यात खेळवण्यात येत आहे. तर यानंतर दुसऱ्या सामन्यात मुंबई विरुद्ध पंजाब आमनेसामने असणार आहेत. मुंबईसाठी दुसऱ्या टप्पा वाईट राहिला. मुंबईला सलग 3 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी मुंबईला या सामन्यात विजय मिळवणं बंधनकारक असेल. (ipl 2021 mi vs pbks hitman rohit sharma have needed to 2 sixes for completed 400 sixes in t 20 cricket)
दरम्यान या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला किर्तीमान करत रेकॉर्डब्रेक करण्याची संधी आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणत्याही भारतीय फलंदाजाला न जमलेला कारनामा रोहितला करण्याची संधी आहे.
काय आहे रेकॉर्ड?
रोहितला टी 20 क्रिकेटमध्ये 400 सिक्सचा टप्पा पूर्ण करण्याचा सुवर्णसंधी आहे. रोहितला या 400 सिक्ससाठी फक्त 2 सिक्सची आवश्यकता आहे. रोहितने पंजाब विरुद्ध 2 सिक्स लगावताच तो पहिला भारतीय आणि एकूण 7 वा फलंदाज ठरेल. आतापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये 6 जणांनी 400 पेक्षा अधिक सिक्स ठोकले आहेत.
तसेच रोहित 2 सिक्स लगावल्यास तो एरॉन फिंचलाही पछाडेल. एरॉनच्या नावे 399 सिक्स आहेत. सध्या रोहित 398 सिक्ससह 8 व्या तर फिंच 399 सिक्ससह 7 व्या नंबरवर आहे.
टी 20 मध्ये सर्वाधिक सिक्स
ख्रिस गेल - 1042
कायरॉन पोलार्ड - 757
आंद्रे रसेल - 510
ब्रँडन मॅक्युलम - 485
शेन वॉटसन - 467
एबी डी व्हीलियर्स - 432