IPL 2021: आपल्या डेब्यूमॅचमध्ये रेकॅार्ड करणऱ्या या खेळाडूने मुंबईची मॅच पलटली, 3 चौके आणि 13 धावांची कहानी!

 मुंबईच्या विजयापेक्षा केकेआरने हा सामना ज्या प्रकारे गमावला तो आश्चर्यचकित करणारा होता. कारण गोलंदाजीत संघाने चांगली कामगिरी केली होती, आणि लक्ष्याचा पाठलाग करूनही 15 व्या ओव्हरपर्यंत केकेआरच्या हातात पूर्णपणे मॅच होती.

Updated: Apr 14, 2021, 05:27 PM IST
IPL 2021: आपल्या डेब्यूमॅचमध्ये रेकॅार्ड करणऱ्या या खेळाडूने मुंबईची मॅच पलटली, 3 चौके आणि 13 धावांची कहानी! title=

चेन्नई : मंगळवार 13 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सने (MI) आयपीएल 2021 (IPL2021) मध्ये पहिला विजय नोंदवला. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सीझनच्या पाचव्या सामन्यात मुंबईने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला 10 धावांच्या फरकाने पराभूत केले. मुंबईच्या विजयापेक्षा केकेआरने हा सामना ज्या प्रकारे गमावला तो आश्चर्यचकित करणारा होता. कारण गोलंदाजीत संघाने चांगली कामगिरी केली होती, आणि लक्ष्याचा पाठलाग करूनही 15 व्या ओव्हरपर्यंत केकेआरच्या हातात पूर्णपणे मॅच होती.

असे असूनही, केकेआरने 10 धावांनी सामना गमावला. मुंबईच्या या विजयाचा मुख्य नायक लेग स्पिनर राहुल चहर होता, त्याने 4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेतल्या, पण  कृणाल पांड्याने यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. त्याने प्रथम बॅाटिंग करुन आणि नंतर बॅालिंगने आपले योगदान मुंबई इंडीयन्सला मॅच जिंकवण्यासाठी दिले.

या सीझनमधील पहिल्या सामन्याप्रमाणेच मुंबई इंडियन्सची बॅटिंग पुन्हा एकदा चेन्नईच्या मैदानावर अत्यंत खराब होती. सूर्यकुमार यादव 56 आणि कर्णधार रोहित शर्मा 43 यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही बॅट्समॅनकडून संघासाठी कोणतेही मोठे योगदान नव्हते. क्विंटर डी कॉक, ईशान किशन, हार्दिक पंड्या आणि कीरन पोलार्ड सारखे बॅट्समॅन फारच अपयशी ठरले. मुंबईने 18 व्या ओव्हरमध्ये 126 धावांत 7 विकेट्स गमावले. मुंबईला 150च्या स्कोर पर्यंत पोहोचनेही जवळ जवळ अशक्यचं दिसत होते.

3 चौके मारुन 150 धावा फटकावल्या

येथेच एक छोटा पण वेगवान डाव खेळणार्‍या क्रुणाल पांड्याने मुंबईला अशा स्थितीत आणले, जिथे त्यांना थोडा मोठा स्कोर मिळायला मदत झाली.
इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय सामन्यात केवळ 26 बॅालमध्ये अर्धशतक ठोकून विश्वविक्रम करणाऱ्या क्रुणालने या खेळात तसा मोठा डाव खेळला नाही, परंतु केवळ 9 बॅालमध्ये 3 चौकारांच्या मदतीने त्याने आवश्यक असलेल्या 15 धावा केल्या. शेवटच्या काळात मारलेले हे 3 चौकार खूप मोठा फरक पाडणारे सिद्ध झाले.

18 व्या ओवरची कमाल

कोलकत्ताचे बॅट्समॅन  संघासाठी आवश्यक धावा करत होते, तेव्हा क्रुणाल पांड्याने बॅालिंगमध्ये आणखी आश्चर्यकारक कामगिरी केली. डाव्या हाताने खेळणाऱ्या क्रुणालने पॉवरप्लेमध्ये त्याच्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिल्या. त्यामुळे दोन्हीही प्रकारे क्रुणाल फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले. त्याच्यामुळे केकेआरसाठी दबाव राहिला आणि याचा फायदा राहुल चहरने घेतला आणि 4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेतले. या दरम्यान, क्रुणाललाही शकीब अल हसनचा मोठा विकेट मिळाला.

याचा फायदा जसप्रीत बुमराहने 19 व्या ओव्हरमध्ये घेतला आणि त्यानंतर 20वी ओव्हर ट्रेन्ट बोल्टने घेतला. क्रुणालने त्याच्या 4 ओव्हरमध्ये अवघ्या 13 धावा देत 1 गडी बाद केला. या दरम्यान, क्रुणालने 13 डॉट बॉलही टाकले, यामुळे मुंबईला मॅचमध्ये मोठा फरक करण्यास यश मिळाले.