मुंबई: कोलकाता विरुद्ध पंजाब आज सामना रंगणार आहेत. आयपीएलमध्ये शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना होणार आहे. या सामन्यामध्ये नेमकं कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तुफान फलंदाजी करणाऱ्या ख्रिस गेलनं पंजाब किंग्स संघाची साथ सोडली आहे. तर दुसरीकडे हेड टू हेड सामने काय सांगत आहेत जाणून घेऊया.
कोलकाता विरुद्ध पंजाब संघ आतापर्यंत 28 सामने एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. त्यापैकी 19 सामने कोलकाता संघ जिंकला आहे. तर पंजाब संघाला केवळ 9 सामने जिंकण्य़ात यश आलं आहे. तर कोलकाता संघाला 9 सामने पराभूत करण्यात यश आलं आहे. तर 19 सामने पंजाबने गमवले आहेत. IPL च्या पहिल्या टप्प्यात झालेल्या सामन्यात कोलकाता संघाने विजय मिळवला होता.
पॉईंट टेबलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स संघ 18 गुण मिळवून प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर तर बंगळुरू तिसऱ्या स्थानावर आहे. कोलकाता आणि मुंबईमध्ये टफ फाईट सुरू आहे. आजचा सामना जर कोलकाता संघ जिंकला तर कोलकाता संघाच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा वाढतील.
आजचा सामना किंग खानची टीम जिंकणार की प्रिती झिंटाची टीम जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ख्रिस गेलनं IPL मधून माघार घेतली आहे. विशेष म्हणजे, कोरोना कालावधीनंतर क्रिकेट पुन्हा सुरू झाल्यापासून ख्रिस गेल बायो बबलचा एक भाग आहे. तो वेस्ट इंडिजसाठी, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. मग सीपीएल आणि मग आयपीएल.
आगामी टी -20 विश्वचषकासाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करण्यासाठी ख्रिस गेलनं आता ही माघार घेतल्याचं सांगितलं जात आहे. तो काही दिवसांच्या विश्रांतीसाठी दुबईमध्ये असेल आणि त्यानंतर त्याचा संघ वेस्ट इंडिजसाठी टी -20 विश्वचषकाची तयारी करेल असं सांगण्यात आलं आहे.