IPL 2021: प्ले ऑफआधी कोलकाता संघासाठी मोठी खुशखबर

कोलकाता संघासाठी खुशखबर, प्ले ऑफमध्ये खेळणार हा स्टार प्लेअर

Updated: Oct 8, 2021, 09:26 PM IST
IPL 2021: प्ले ऑफआधी कोलकाता संघासाठी मोठी खुशखबर title=

दुबई: IPL मधील 14 व्या हंगामातील सामने अखेरच्या टप्प्यात आले आहेत. शुभमन गिलच्या अर्धशतकी खेळीनंतर, कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने गुरुवारी आयपीएलच्या शेवटच्या साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 86 धावांनी पराभव केला. लॉकी फर्ग्युसन आणि शिवम मावी यांच्या झंझावाती गोलंदाजीमुळे प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित झाले. कोलकाता नाईट रायडर्सच्या या मोठ्या विजयामुळे मुंबई इंडियन्स आयपीएलच्या प्ले-ऑफमधून जवळजवळ बाहेर जाणार हे निश्चित झालं आहे.

मुंबई इंडियन्सला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवणे जवळजवळ अशक्य आहे. मुंबई संघाला SRH ला 170 हून अधिक धावांनी पराभूत करणं आवश्यक आहे. जर ते नाही झालं तर रनरेटनुसार कोलकाता संघ पुढे निघून जाईल.

आयपीएलच्या प्ले-ऑफपूर्वी केकेआरसाठी मोठी बातमी समोर येत आहे. केकेआर संघाचा ऑलराऊंडर खेळाडू आंद्रे रसेल IPL 2021 प्लेऑफमध्ये खेळू शकतो. आंद्रे रसेल जर प्ले ऑफमध्ये खेळला तर तिसऱ्यांदा कोलकाता संघाला चॅम्पियन होण्याची संधी आहे. 

कोलकात्याला तिसऱ्यांदा चॅम्पियन होण्याची संधी आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य सल्लागार डेव्हिड हसी सामन्यानंतर म्हणाले, "रसेलची बुधवारी फिटनेस चाचणी होती आणि मला वाटते की तो लवकरच परत येईल." तो प्लेऑफमध्ये खेळण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे.

डेव्हिड हसी म्हणाले की, 'रसेल खेळणे केवळ आमच्यासाठीच नव्हे तर स्पर्धेसाठीही महत्त्वाचे आहे. तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. 'दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्कं केलं आहे. केकेआरने चौथ्या स्थानावर आपले स्थान मजबूत केले आहे.