"मी कोहलीकडे कधीही बोट दाखवणार नाही", RCB च्या निराशाजनक कामगिरीनंतर दिग्गजाची प्रतिक्रिया

कोलकाता विरुद्ध झालेल्या पराभवानंतर RCB चा कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) सडकून टीका केली जात आहे.

Updated: Oct 12, 2021, 09:30 PM IST
"मी कोहलीकडे कधीही बोट दाखवणार नाही", RCB च्या निराशाजनक कामगिरीनंतर दिग्गजाची प्रतिक्रिया title=

यूएई : आयपीएलच्या 14 व्या हंगामातील एलिमिनेटर सामन्यात (IPL Eliminator 2021) कोलकाताने बंगळुरुवर 4 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह कोलकाता क्वालिफायर 2 मध्ये पोहचली. तर विराटसेनेचं आव्हान संपुष्टात आलं. विराटच्या कॅप्ट्न्सीचा शेवटही पराभवाने झाला. विराटचं कर्णधार म्हणून हा अखेरचा हंगाम होता. (ipl 2021 eliminator Will never point fingers at virat kohli says brian lara after kkr beat rcb by 4 wickets)

विराटने 9 वर्ष बंगळुरुचं नेतृत्व केलं. मात्र विराटला एकदाही ट्रॉफी जिंकून देता आला नाही. त्यामुळे विराटचा या मोसमात बंगळुरुला ट्रॉफी जिंकवून शेवट गोड करण्याचा मानस होता. मात्र यात काही यश आलं नाही. त्यामुळे विराटवर चहुबाजूने टीका होतेय. 

एका बाजूला विराटवर टीका होत असताना मात्र वेस्टइंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने विराटची बाजू सावरली आहे. मी कोणत्याही स्थितीत विराटकडे कधीही बोट दाखवणार नाही, असं लारा म्हणाला. 

लारा काय म्हणाला?

"जर मी बंगळुरु टीमचा मालिक असतो, तर विराटला पुढेही कॅप्ट्न्सी करण्यास सांगितलं असतं. विराट खेळाडू आणि कर्णधार म्हणून पूर्णपणे वेगळा आहे. विराट हा हाय प्रोफाईल खेळाडू आहे. तो युवा आहे. तसेच तो अन्य खेळाडूच्या नेतृत्वात खेळण्यास तयार आहे. विराटला बंगळुरुसोबतच राहायचंय", असं लारा क्रिकेट डॉट कॉमसोबत बोलताना म्हणाला. 

"मी विराटला त्याच्या मर्जीतले खेळाडू दिले असते. त्यानंतर काही वर्ष त्यांच्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत केलं असतं. हे फार अवघड आहे आणि मी कधीही कोहलीकडे कधीही बोट दाखवणार नाही जो मैदानावर 100 टक्के देतो", असं लारा म्हणाला.  

"तुम्ही टॉस जिंकला. तुम्हाला जे काही करायचं होतं, ते तुम्ही करु शकत होता. आरसीबीने 5 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 49 धावा केल्या होत्या. देवदत्त पडीक्कल आऊट झाल्यानंतर विराट जरा संथपणे खेळू लागला. जर तुम्ही पावर प्लेच्या प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धावा करता, तर उर्वरित षटकांमध्ये प्रति ओव्हर 6 धावा करुच शकता आणि यात काही चूकीचं नाही. मात्र असं करताना विकेट्सही गमावता कामा नये", असंही लाराने सांगितलं.